पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) नवरात्रीनिमित्त पुण्यातून विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर येथून सप्तशृंगी गड, तुळजापुर, कोल्हापुर, ज्योतिबा याठिकाणी जाण्यासाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत. शिवाजीनगर-सप्तशृंगी गड ही बस रात्री १०.४५ वाजता सुटेल. या बसला प्रति प्रवासी ४९० रुपये तिकीट दर असणार आहे. शिवाजीनगर-तुळजापुर मार्गावर शिवशाही बस सोडण्यात येणार आहे. दररोज सकाळी ६, ८, दुपारी २, रात्री ८ व ९.३० वाजता प्रवाशांना बस उपलब्ध असेल. या गाडीला ५६५ रुपये तिकीट दर ठेवण्यात आला आहे. कोल्हापुर मार्गे शिवाजीनगर-पणजी ही बस पहाटे ४.३०, ५.१५, सायंकाळी ४, ७, रात्री ८.३० व ११ वाजता सोडण्यात येईल. या मार्गावर शिवशाही बस असून ४५५ रुपये तिकीट दर राहील. शिवाजीनगर-जोतिबा मार्गावर सकाळी ७ व दुपारी २.४५ वाजता बससेवा सुरू राहील. या बसचा तिकीट दर ४०७ रुपये असणार आहे. सर्व गाड्यांना आरक्षणाची सुविधा असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.----------
नवरात्रीनिमित्त पुण्यातून एसटीच्या जादा बस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 20:28 IST
शिवाजीनगर येथून सप्तशृंगी गड, तुळजापुर, कोल्हापुर, ज्योतिबा याठिकाणी जाण्यासाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत.
नवरात्रीनिमित्त पुण्यातून एसटीच्या जादा बस
ठळक मुद्देशिवाजीनगर-तुळजापुर मार्गावर शिवशाही बस सोडण्यात येणारसर्व गाड्यांना आरक्षणाची सुविधा