नीरा-भीमाकडून २ हजार ५०० पेक्षा अधिक दर: हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 05:24 PM2021-10-23T17:24:17+5:302021-10-23T17:41:29+5:30

बारामती: शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालू सन २०२१-२२ या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन २ हजार ५०० पेक्षा ...

more than 2 thousand 500 rates nira bhima sugar factory harshvardhan patil | नीरा-भीमाकडून २ हजार ५०० पेक्षा अधिक दर: हर्षवर्धन पाटील

नीरा-भीमाकडून २ हजार ५०० पेक्षा अधिक दर: हर्षवर्धन पाटील

Next

बारामती: शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालू सन २०२१-२२ या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन २ हजार ५०० पेक्षा अधीक दर देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी जाहीर केले. कारखान्याच्या संचालक मंडळाची शनिवारी (दि.२३) शहाजीनगर येथे ऊस दरासंदर्भात बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत झाली.

यंदाच्या हंगामात कारखाना ७ लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार आहे. तर इथेनॉलचे १ कोटी ६० लाख लि., सेंद्रिय बॅग २ लाख निर्मिती, १५ लाख घनमीटर बायोगॅस निर्मितीचे आणि सहवीज निर्मिती प्रकल्पातून ४ कोटी ५० लाख युनिट वीज एक्सपोर्टचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची देय रक्कम दिवाळीपूर्वी अदा केली जाईल. तसेच कामगारांना ८.३३ टक्के बोनस देण्यात येईल, असे हर्षवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी  सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील,  राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जामदार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड  उपस्थित होते.

Web Title: more than 2 thousand 500 rates nira bhima sugar factory harshvardhan patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app