शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

मान्सून १० जूनपर्यंत राज्य व्यापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 21:45 IST

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने हवामानाचा १० दिवसापर्यंतचा अंदाज वर्तविण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे.

ठळक मुद्देवेधशाळा : लघुकालीन अंदाजासाठी इपीएस प्रणाली आणलीभारतीय हवामान विज्ञान विभागातील संशोधकांनी ही प्रणाली विकसित केली या प्रणालीमुळे लघु-मध्यम काळातील अंदाजात अधिक सुधारणा होणार आपत्कालीन परिस्थितीत अधिक चांगला निर्णय घेण्यासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका

पुणे : हवामानाच्या लघु आणि मध्यमकालीन अंदाजात आणखी सुधारणा करण्यासाठी पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने भूखंडीय हवामान अंदाज प्रणाली (एन्सेम्बल प्रिडीक्शन सिस्टीम) आणली आहे. त्यानुसार ८ ते १० जून पर्यंत राज्य मान्सून व्यापेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने हवामानाचा १० दिवसापर्यंतचा अंदाज वर्तविण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे. पुण्यातील भारतीय उष्णकटीय हवामान विज्ञान विभाग (आयआयटीएम), नोएडातील राष्ट्रीय मध्यम अवधी हवामान अंदाज केंद्र (एनसीएमआरडब्लूएफ) आणि भारतीय हवामान विज्ञान विभागातील संशोधकांनी ही प्रणाली विकसित केली आहे. जगभरातील काही निवडक देशांमध्ये हवामानाचा लघु आणि मध्यम कालावधीचा अंदाज वर्तविण्याची प्रणाली आहे. या प्रणालीमुळे लघु-मध्यम काळातील अंदाजात अधिक सुधारणा होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत अधिक चांगला निर्णय घेण्यासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. या प्रणालीमुळे हवामानाच्या घटकांतील लहानश बदलांच्या देखील उच्चस्तरीय प्रतिमा मिळविणे शक्य झाले आहे. त्याचा उपयोग कृषी, जलसंवर्धन, पर्यजन, ऊर्जा तसेच अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णय घेण्यासाठी होईल. हवामान विभागाने या प्रणालीनुसार दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनची वाटचाल समाधानकारक असल्याचे सांगितले आहे. येत्या ११ जून पर्यंतचा अंदाज दिला आहे. त्यानुसार कर्नाटक राज्य ५ जून पर्यंत मान्सून सर्वदूर पोहोचेल. तर, महाराष्ट्रात ८ ते १० जून दरम्यान मान्सून व्यापेल असे सांगण्यात आले आहे.   

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊस