शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Rain: सात दिवसांपासून मॉन्सूनला ‘ब्रेक’; बळीराजा चिंतेत, पुढील ३,४ दिवसात सक्रिय होणार

By श्रीकिशन काळे | Updated: June 18, 2024 16:09 IST

पुण्यासह राज्यात ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे

पुणे: गेल्या बुधवारी (दि.१२) मॉन्सूनने विदर्भातील अमरावती, चंद्रपूरच्या भागापर्यंत मजल मारली होती, परंतु, त्यानंतर मात्र मॉन्सून तिथेच थबकला आहे. तिथून पुढे त्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही. आज (दि.१८) सात दिवस झाले मॉन्सूनची हालचाल झालेली नाही, त्यामुळे शेतकरी राजा चिंतेमध्ये आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये मॉन्सून सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरवातीला चांगली वेगाने झाली. केरळमध्ये ३० मे रोजी दाखल झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातही वेळेअगोदर हजेरी लावली. परंतु, विदर्भात मात्र चांगलाच रेंगाळलेला आहे. दरम्यान, राज्यामध्ये काही भागात ढगाळ हवामानासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. दुष्काळी भाग असलेल्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला असून, इतर भागात काहीच झालेला नाही. आज मंगळवारी(दि. १८) कोकण आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल, असा अंदाज दिला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.  पुण्यासह राज्यात ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढलेला आहे. विदर्भामध्ये मात्र दमदार पावसाची प्रतिक्षा असून, मॉन्सून दाखल होऊन देखील पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या आहेत. 

विदर्भामध्ये पाऊस गायब झालेला आहे, तर दुसरीकडे तापमानाचा चटका सहन करावा लागत आहे. कमाल तापमान चाळीशीपार गेलेले आहे. सोमवारी (दि.१७) विदर्भातील चंद्रपूर (४०.४), ब्रह्मपुरी (४१.९), चंद्रपूर (४०.४), नागपूर (४०.४), वर्धा (४०.०) या जिल्ह्यांचे तापमान चाळीशीपार होते. तर यवतमाळ(३९.५), गोंदिया(३९.४), अकोला(३९.२) या जिल्ह्यांमध्येही चाळीशीच्या जवळ तापमान नोंदवले गेले. आज मंगळवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रTemperatureतापमानenvironmentपर्यावरणHealthआरोग्य