शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर सावकारीतून मराठे ज्वेलर्सना दिले होते पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठे ज्वेलर्सचे बळवंत मराठे यांना नीलेश शेलार आणि दीप्ती काळे यांनी बेकायदेशीर सावकारीतून पैसे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठे ज्वेलर्सचे बळवंत मराठे यांना नीलेश शेलार आणि दीप्ती काळे यांनी बेकायदेशीर सावकारीतून पैसे दिले आहे. त्याच्या व्याजापोटी त्यांनी पैसे आणि सोने जबरदस्तीने घेऊन गेले होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दीप्ती सरोज काळे (रा. उत्तमनगर) आणि नीलेश उमेश शेलार (रा. मानकर रेसिडेन्सी, कोथरूड) यांना अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने नीलेश शेलार याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. न्यायालयाच्या लेखी आदेशान्वये दीप्ती काळे हिला पोलिसांनी मध्यरात्री पावणे दोन वाजता घरातून अटक केली. काळे हिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले असताना सायक्लोफामच्या २ ते ३ गोळ्या खाल्ल्याने त्यांना चक्कर येत होती. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडी मागितली होती.

दीप्ती काळे यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात यापूर्वी खंडणी, खुनाचा प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. काळे व शेलार यांनी मराठे यांच्या घरी तसेच दुकानात जाऊन बेकायदेशीर सावकारीचे धंद्यातून गुंतवलेल्या पैशावरील व्याजाच्या रक्कमेची मागणील्रून पैसे दिले नाहीत तर तुम्हाला बघून घेईल, असे धमकावले होते. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. तोसीफ शेख, अ‍ॅड. क्रांती सहाणे, अ‍ॅड. सूरज जाधव व इतरांनी काम पाहिले.

नीलेश शेलार याने मराठे यांच्या दुकानात प्रवेश करुन बेकायदेशीर सावकारीचे धंद्यातून दिलेल्या पैशांचे व्याजापोटी खंडणी म्हणून रुपये आणि सोने घेऊन गेलेला आहे. ते हस्तगत करायचे आहे. शेलाराने धमकी दिल्याचे व्हॉईस रेकॉडिंग उपलब्ध आहे. शेलार याचा व्हॉईस सॅम्पल घेऊन तो न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवायचा आहे. नीलेश शेलार याने सावकारीतून दिलेल्या पैशाच्या व्याजाची मागणी करून मानसिक त्रास दिलेला आहे. त्याबाबत तपास करायचा आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे इतर व्हाईट कॉलर गुन्हेगारांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे, त्याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली़.