शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही दबावाशिवाय मुलाकडूनच रक्कम किंवा वस्तू; मुस्लीम समाजातील ‘मेहर’ हा विवाहातील धार्मिक हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:53 IST

मेहर ही नवऱ्याची जबाबदारी मानली जात असून ही रक्कम नकद, दागिने, जमिन, घर किंवा इतर मौल्यवान वस्तूंमध्ये दिली जाऊ शकते

उजमा शेख 

पुणे : मुस्लीम समाजातील विवाहमध्ये वधूला दिला जाणारा ‘मेहर’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ‘मेहर’ ही नवऱ्याने आपल्या वधूला देणारी ठराविक रक्कम किंवा वस्तू असते, जी तिच्या सन्मान, स्वातंत्र्य व आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक असते.

निकाहच्या वेळी वधू आणि वरामध्ये अनेक अटी ठरविल्या जातात. त्यामध्ये ‘मेहर’ हे एक अनिवार्य आणि मूलभूत तत्त्व आहे. इस्लामिक कायद्यानुसार ‘मेहर’ वधूचा धार्मिक अधिकार आहे आणि तो कोणत्याही दबावाशिवाय दिला जावा, अशी अपेक्षा असते. यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही आणि ती नवऱ्याची जबाबदारी मानली जाते. ‘मेहर’ ही रक्कम नकद, दागिने, जमिन, घर किंवा इतर मौल्यवान वस्तूंमध्ये दिली जाऊ शकते. काही वेळा ही रक्कम विवाहाच्या वेळी दिली जाते, तर काही वेळा ती विवाहानंतरच्या जीवनात कधीही मागणी केल्यावर दिली जाऊ शकते. ही रक्कम वधूच्या गरजेच्या वेळी तिच्या मदतीला येते आणि तिचा वैयक्तिक अधिकार म्हणून ओळखली जाते.

स्त्रीच्या आर्थिक सशक्तीकरणाचे साधन

‘मेहर’ ही संकल्पना केवळ धार्मिकच नाही, तर स्त्रीच्या आर्थिक सशक्तीकरणाशीही संबंधित आहे. विवाहित आयुष्यात महिलेला कधीही कठीण प्रसंग ओढवला, तर ‘मेहर’ची रक्कम तिच्या स्वतःच्या मालकीची असल्यामुळे ती तिच्या गरजांसाठी वापरू शकते. त्यामुळे ‘मेहर’ ही स्त्रीसाठी केवळ विवाहाशी संबंधित रक्कम नसून, तिच्या आत्मनिर्भरतेचा एक आर्थिक आधार आहे.

नवीन पिढीचा सकारात्मक दृष्टिकोन

नवीन पिढीमध्ये ‘मेहर’बाबत अधिक सजगता निर्माण होत असल्याचे अनेक उदाहरणांतून दिसून येते. काही जोडपी आपल्या निकाहनाम्यात ‘मेहर’च्या स्वरूपात केवळ पैसेच नव्हे, तर शिक्षणाचा खर्च, व्यवसायासाठी गुंतवणूक, किंवा मालमत्ताही जाहीर करत आहेत. ही परंपरा काळानुसार रूप बदलत असली, तरी तिचे मूळ उद्दिष्ट वधूच्या सन्मान आणि हक्कांचे रक्षण आजही जपले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMuslimमुस्लीमmarriageलग्नMONEYपैसाhusband and wifeपती- जोडीदारEducationशिक्षण