विनयभंग करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: September 29, 2016 05:51 IST2016-09-29T05:51:38+5:302016-09-29T05:51:38+5:30

तरुणी अंघोळ करताना लपून मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी १९ वर्षांच्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असल्याची

Moliere arrested | विनयभंग करणाऱ्यास अटक

विनयभंग करणाऱ्यास अटक

चाकण : तरुणी अंघोळ करताना लपून मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी १९ वर्षांच्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांनी दिली.
ही घटना रविवारी (दि. २५) सकाळी साडेनऊच्या सुमारास रोहकल रस्त्यावरील शेळी बाजाराजवळ घडली. तरुणी अंघोळ करीत असताना आरोपीने गुपचूप मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनील वाघमारे (वय १९, रा. रोहकल रोड, शेळीबाजाराजवळ चाकण, मूळगाव - श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याच्यावर कलम ३५४ क अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्चना दयाळ या पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Moliere arrested