Pune: बनावट नाव धारण करुन लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

By विवेक भुसे | Updated: October 4, 2023 17:09 IST2023-10-04T17:09:15+5:302023-10-04T17:09:46+5:30

याप्रकरणी पीडितेने कोंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कारासह फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

molested on the lure of marriage, the victim was cheated of 26 lakh 60 thousand | Pune: बनावट नाव धारण करुन लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

Pune: बनावट नाव धारण करुन लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

पुणे : बनावट नाव सांगून त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात तोटा झाल्याचे सांगून २६ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ३० वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार अमित चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विवाहासाठी एक वेबसाईटवर प्रोफाईल तयार केली होती. त्यावर स्वत:चे नाव लपवून रोहित राजाराम देशमुख असे नाव अमित चव्हाण याने सांगितले. फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फिर्यादीशी शारीरीक संबंध ठेवले. त्याचे व्हिडिओ काढले. आपला इम्पोर्ट -एक्सपोर्टचा व्यवसाय असून त्यामध्ये तोटा झाला असे सांगून फिर्यादी यांना कर्ज काढायला लावले. कर्ज काढलेले २६ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यांनी कर्जाचा हप्ता भरायला सांगितल्यावर त्याने नकार देऊन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी चौकशी केली तेव्हा त्याने आपले खरे नाव लपवून ठेवले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title: molested on the lure of marriage, the victim was cheated of 26 lakh 60 thousand