शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 14:11 IST2024-05-06T14:10:44+5:302024-05-06T14:11:43+5:30

आरोपीविरोधात पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....

molested of the minor daughter of a farm laborer, a shocking incident in Pune district | शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंचर (पुणे) : शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी घनश्याम हरिदास निकम (रा. नागापूर) याच्याविरोधात पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर शेतमजूर कुटुंब नागापूर गावच्या हद्दीत निकम यांच्या शेतामधील खोलीत राहत होते. तिचे कुटुंब आरोपीच्या शेतात काम करीत होते. घनश्याम हरिदास निकम याने दहा ते पंधरा दिवसांपूर्वी नागापूर गावचे हद्दीत शेतातील रूममध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पंधरा वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती करून बलात्कार केला आहे.

मुलीने प्रतिकार केला, तरीही निकम याने अत्याचार केला आहे. सदर पीडित मुलीने फिर्याद दिल्यानंतर घनश्याम हरिदास निकम (रा. नागापूर) याच्याविरोधात पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील करीत आहेत.

Web Title: molested of the minor daughter of a farm laborer, a shocking incident in Pune district