पुण्यात चाकूचा धाक दाखवून पतीसमोर केला बलात्कार; नराधमाची पोलिसांनी काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 12:08 IST2023-07-29T12:04:52+5:302023-07-29T12:08:34+5:30

हडपसर पोलिसांनी गुरुवारी भर पावसात धिंड काढली...

molested in front of husband at knife point in Pune hadapsar latest crime news | पुण्यात चाकूचा धाक दाखवून पतीसमोर केला बलात्कार; नराधमाची पोलिसांनी काढली धिंड

पुण्यात चाकूचा धाक दाखवून पतीसमोर केला बलात्कार; नराधमाची पोलिसांनी काढली धिंड

पुणे : उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पत्नीवर बलात्कार केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला होता. इम्तियाज हशीम शेख (४७, म्हाडा कॉलनी, हडपसर) असे या नराधमाचे नाव असून, त्याची हडपसर पोलिसांनी गुरुवारी भर पावसात धिंड काढली. याप्रकरणी बोपखेल येथील महिलेने तक्रार दिली आहे.

तक्रारदार महिलेचा पती उदरनिर्वाहासाठी बॅगा विकण्याचे काम करतो. मसाले विक्रेता आरोपी इम्तियाज शेख याने फिर्यादी महिलेच्या पतीस ४० हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे परत करू शकले नसल्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये इम्तियाज याने पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगर येथे बोलवून घेतले. तेथे त्याने पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यासमोरच फिर्यादीवर बलात्कार केला होता.

आरोपीने याच कारणातून महिलेकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी केली; परंतु, तिने नकार दिला असता त्याने त्याच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले चित्रीकरण पतीला पाठवून व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले. दरम्यान, या प्रकरणात महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दिली. या घृणास्पद कृत्याबद्दल पोलिसांकडून धिंड काढण्यात आली.

Web Title: molested in front of husband at knife point in Pune hadapsar latest crime news