शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात तरूणीची छेडछाड करणाऱ्या तरूणाला सुरक्षारक्षकांनी पाठलाग करून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 21:38 IST

विद्यापीठात कायदा हातात घेणाऱ्याना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ आवारात सायंकाळी तरूणीची छेड काढून पळून जाणाऱ्या तरूणास सुरक्षारक्षकांनी पाठलाग करून पकडले. तरूणाने हटकल्यानंतर ती ओरडल्याने परिसरातील सुरक्षारक्षक तातडीने तिथे पोहचले. त्यांना पाहून तरूण पळून जात असताना पेट्रोलिंग करणाऱ्या सुरक्षारक्षकांनी त्याचा पाठलाग केला. या तरूणाला चतुश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.विद्यापीठातील टपाल कार्यालयासमोर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सखाराम त्र्यंबक वर्पे (रा. बोपोडी, मुळ - बीड) असे छेड काढणाऱ्या तरूणाचे नाव आहे. ही तरूणी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास टपाल कार्यालयासमोरून वसतिगृहाकडे निघाली होती. यावेळी एक जणाने मागून येत तिची छेड काढली. घाबरलेल्या तरूणी आरडाओरड केल्यानंतर तरूण पळू लागली. यावेळी परिसरात असलेला सुरक्षा रक्षक आवाजाच्या दिशेने धावत आला. लगेचच घडलेल्या प्रकाराची माहिती पेट्रोलिंग जीपमधील सुरक्षारक्षकांना देण्यात आली. काही वेळात ही जीप तिथे आल्यानंतर तरूण पळाल्याच्या दिशेने गेली. तरूण जवळपास लपला असल्याच्या शक्यतेने त्यांनी सर्च लाईटने परिसरात त्याचा शोध घेतला. तेव्हा त्यांना तो एलिस गार्डनच्या परिसरात लपलेला आढळून आला. सुरक्षारक्षकांना पाहून तो धावत असताना त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडे काही शस्त्र, हत्यार होते का किंवा त्याने ते गार्डनच्या परिसरात टाकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.---------------विद्यापीठातील विशेष सुरक्षा पथकाने सतर्कता दाखवून विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तरूणाला पकडले. त्यांनी दाखविलेली सतर्कता कौतुकास्पद आहे. तरूणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापुढे विद्यापीठात कायदा हातात घेणाऱ्याना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांच्या मदतीने प्रयत्न केले जातील.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकरStudentविद्यार्थी