शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

महिला वकिलाचा विनयभंगाचा प्रकार ठेवला लपवून; स्विगीच्या मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 16:54 IST

बीएमसीसी रोडवरील या महिला वकिलाच्या घरी रात्री पावणे दहा वाजता स्विगीचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला होता.

ठळक मुद्देकंपनीची बदनामी टाळण्यासाठी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष

पुणे : ग्राहक असलेल्या महिला वकिलाची डिलिव्हरी बॉयकडून झालेल्या विनयभंगाबाबतची तक्रार करुनही कंपनीची बदनामी टाळण्यासाठी कारवाई न करणाऱ्या स्विगीच्या मॅनेजरसह पाच जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी डिलिव्हरी बॉय, स्विगी डॉट कॉमच्या बंगळुरु मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापक, पुण्यातील व्यवस्थापक तसेच अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २१ वर्षाच्या महिला वकिलाने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका महिला वकिलाने स्विगी डॉट कॉमवर संपर्क साधून २४ जानेवारी रोजी एक ऑर्डर दिली होती. बीएमसीसी रोडवरील या महिला वकिलाच्या घरी रात्री पावणे दहा वाजता स्विगीचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला होता. ऑर्डर दिल्यानंतर त्याने फिर्यादींकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्या पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या. त्यावेळी त्याने अश्लिल वर्तन केले. पाणी घेऊन त्या पुन्हा बाहेर आल्या. तेव्हा त्याला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.  झाल्या प्रकाराची त्यांनी स्विगी कंपनीच्या कस्टमर केअरला तातडीने फोन करुन कल्पना दिली. मात्र, कंपनीच्या व्यवस्थापकाने कंपनीची बदनामी होऊ नये, म्हणून कोणतीही कारवाई केली नाही.   त्यामुळे या महिला वकिलाने न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करावा व त्याचा अहवाल पाठविण्याचा आदेश डेक्कन पोलिसांना दिला आहे. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भागवत अधिक तपास करीत आहेत.

...................... 

ग्राहकांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची : स्विगी कंपनीकडून भूमिका स्पष्ट 

घडलेल्या प्रकाराबाबत आम्हाला कल्पना असून हा प्रकार लक्षात आल्याक्षणापासून आम्ही पोलिस प्रशासनाशी संपर्कात आहोत. स्विगीमध्ये ग्राहकांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची असून अशा प्रकारची वर्तणूक आम्ही कदापी ही खपवून घेत नाही. आमच्या वितरण भागीदाराचा आमच्या व्यासपीठाशी असलेला ऍक्सेस आम्ही काढून घेतला असून प्रशासनाला त्यांच्या तपासात शक्य त्या सर्व प्रकारे आम्ही मदत करण्यास कटिबद्ध आहोत.स्विगी आपल्या वितरण भागीदारांशी तत्वनिष्ठेतेच्या पातळीवर जोडलेली असते. प्रत्येक वितरण भागीदाराच्या पार्श्वभूमीची तटस्थ संस्थेच्या माध्यमातून कसून पडताळणी केली जाते. ओळख, पत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची खातरजमा केली जाते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSwiggyस्विगीPoliceपोलिस