माेदींचे 'ते' वक्तव्य वायुसेनेचा अपमान करणारे : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 06:23 PM2019-03-04T18:23:32+5:302019-03-04T18:38:45+5:30

राफेल असते तर निर्णय वेगळा असता हे माेदींचे वक्तव्य वायुसेनेचा अपमान करणारे असून माेदींनी त्याबाबत माफी मागायला हवी. अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

modi's that statement is insult of airforce : prithviraj chavan | माेदींचे 'ते' वक्तव्य वायुसेनेचा अपमान करणारे : पृथ्वीराज चव्हाण

माेदींचे 'ते' वक्तव्य वायुसेनेचा अपमान करणारे : पृथ्वीराज चव्हाण

googlenewsNext

पुणे : राफेल असते तर निर्णय वेगळा असता असे नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य हे आपण हवाई लढाई हरल्याची मोदी कबुली देत आहेत. माेदींचे हे वक्तव्य  लाजीरवाने असून हा वायुसेनेच अपमान आहे. केवळ राजकारणासाठी मोदी यांनी हे वक्तव्य केले असून त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. 

न्यू यॉर्क टाईम्स च्या बातमीचा हवाला देत पाकिस्तानच्या विमानांशी सामना न करू शकणारे विमान अभिनंदन यांना दिल्याने ते युद्ध कैदी झाले, असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. चव्हाण म्हणाले, राफेलच्या खरेदीत काँग्रेसमुळे उशीर झाला हा आरोप चुकीचा आहे. 126 राफेल विमानांची गरज असताना हि संख्या 36 वर का आणली याचे उत्तर अद्याप मोदी यांनी दिलेले नाही. इतर देशांनी राफेल भरतामागून खरेदी केले परंतु दलालांची वाट पाहत मोदींनी विमान खरेदी मध्ये उशीर केला. सरकारने 110 विमानाचा पुन्हा या वर्षी टेंडर काढलं आहे.
 
बालकोटला काय घडलं हे सरकारमधून कोणी सांगायला तयार नाही. वायुदलाला जी ठिकाणं सांगण्यात आली तेथे त्यांनी कारवाई केली. परंतु त्यांना चुकीची ठिकाणे सांगण्यात आली, त्यामुळे त्याचा परिणाम न झाल्याची वृत्ते अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे याची संसदीय समिती मार्फत चौकशी व्हायला हवी.

Web Title: modi's that statement is insult of airforce : prithviraj chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.