शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे सरकार दिशा भरकटलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:09 IST

पुणे : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिशा भरकटलेले सरकार आहे. देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटण्यास या सरकारची धोरणे कारणीभूत ...

पुणे : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिशा भरकटलेले सरकार आहे. देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटण्यास या सरकारची धोरणे कारणीभूत ठरली आहेत. देशाची स्थिती बिकट आहे. कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय सुरू असलेला कारभार देशाला हानिकारक असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केली.

पुणे शहर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी, शहराध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, माजी आमदार मोहन जोशी, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रफिक शेख, रवींद्र धंगेकर, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, संगीता तिवारी, रमेश अय्यर आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

यावेळी शहराध्यक्ष बागवे म्हणाले, मागील सात वर्षे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेच्या हितापेक्षा उद्योजकांचे हित जपले गेले. जीएसटी, नोटबंदीच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. शेतकरी प्रश्नांवर हे सरकार अपयशी ठरले असून शेतीसंबंधी काळे कायदे करण्यात आले. अनेकांचे रोजगार बुडाले असून कोट्यवधी तरुण बेरोजगार झाले आहेत. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात या सरकारला पूर्णपणे अपयश आले. लसीकरणाबाबतही हे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. विदेशात लसी पाठवून आपल्याच देशातील जनतेला वंचित ठेवण्याचे पाप या सरकारने केल्याचे बागवे म्हणाले.