Video: 'मोदीजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है', पुण्यात एमआयटीच्या प्रांगणात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 11:57 IST2022-03-06T11:55:43+5:302022-03-06T11:57:15+5:30

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी पुण्यात आगमन झाले आहे. सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात ...

'Modiji, you go ahead, we are with you', sloganeering in the premises of MIT in Pune | Video: 'मोदीजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है', पुण्यात एमआयटीच्या प्रांगणात घोषणाबाजी

Video: 'मोदीजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है', पुण्यात एमआयटीच्या प्रांगणात घोषणाबाजी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी पुण्यात आगमन झाले आहे. सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. पुण्यातील एमआयटी कॉलेजला नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

 पंतप्रधान येण्याअगोदरच कॉलेजच्या प्रांगणात पुणेकरांनी गर्दी केली आहे. यावेळी 'मोदीजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है', मोदी मोदी... अशी घोषणाबाजी पुणेकरांकडून करण्यात आली आहे. आसपासचा सर्व परिसर पूर्णपणे भरलेला दिसून येत आहे. आता महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण मोदींच्या हस्ते झाले आहे. ते आता पुण्यातील गरवारे मेट्रोने प्रवास करत एमआयटी कॉलजेला जाणार आहेत. 

Web Title: 'Modiji, you go ahead, we are with you', sloganeering in the premises of MIT in Pune