शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरज अडागळे टोळीवर मोक्का कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:39 IST

सहकारनगर पोलिसांनी ९ जणांवर होता गुन्हा दाखल..

पुणे : जुन्या भांडणावरुन मयुर आरडे याच्यावर कोयत्याने वार करत जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण करुन दोन्ही हातांचे करंगळीजवळील बोटे तोडण्याच्या गुन्ह्यात सहकारनगर पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला होता.सुरज अडागळे व त्याच्या टोळीने हा हल्ला केला होता. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सुरज अडागळे व त्याच्या ६ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सुरज अडागळे, आनंद ऊर्फ सोनु सिद्धेश्वर धडे(फरार), एजाज ऊर्फ रॅगी इसाक शेख, मोन्या ऊर्फ अपूर्व संजय खंडागळे, मंदार खंडागळे, नागेश ढावरे, केंदार खंडागळे अशी आरोपींची नावे आहेत.

मनोज ढावरे व मयुर आरडे यांच्या भांडणे झाली होती. या कारणावरुन ६ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ५ वाजता तळजाई वसाहतीतील घरासमोर आरडे याच्यावर आरोपींनी कोयत्याने वार करुन जखर जखमी केले होते. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याच्या तपासात सुरज अडागळे याने संघटीत टोळी तयार करुन हा खुनी हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. संघटीत टोळीच्या माध्यमातून अडागळे याने टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, तडीपारीचा भंग करणे, विनयभंग, बाल लैगिक अत्याचार, शस्त्रजवळ बाळगणे असे गुन्हे सातत्याने केले आहेत.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला. डॉ. शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजूर दिली असून सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्ह्यांच्या ठिकाणी स्वत: भेट देऊन कठोर व कडक कारवाई करण्याबाबत वैयक्तिक मार्गदर्शन केले. गुन्ह्याचा सखोल तपास करुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत केलेली ही ५ वी कारवाई आहे. नव्या वर्षातील ही दुसरी कारवाई आहे.

टॅग्स :Puneपुणेcommissionerआयुक्तPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी