शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी; आंतरराज्यीय टोळीकडून १५ लाखांचे मोबाईल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 19:01 IST

मागील १० दिवसांपासून या परिसरात चोरी करत असल्याची कबुली चोरांनी दिली

धायरी : सध्या राज्यामध्ये गणेशोत्सव सण मोठया प्रमाणात साजरा होत असून या सणानिमित्त खरेदी व दर्शनाकरीता नागरिक मोठया प्रमाणात गर्दी करीत असतात. याच गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी व पाकिट चोरीचे गुन्हे मोठया प्रमाणात घडत असतात. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी करून आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडुन त्यांच्याकडून १५ लाख २५ हजार रुपयांचे एकूण ८४ मोबाईल फोन जप्त केले आहेत. याप्रकरणी शरथ मंजुनाथ, (वय २१ वर्षे)  केशवा लिंगराजु (वय २४ वर्षे) नवीन हनुमानथाप्पा ( वय १९ वर्षे) सर्व राहणार हौसमाने भद्रावती शिमोगा राज्य :कर्नाटक) तिघांना ताब्यात घेतले आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हयांच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर यांना त्यांच्या खास बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, मोबाईल चोरी करणारे तीन इसम फनटाईम थिएटरच्या मागील रस्त्यावर थांबलेले असून त्यांच्याकडे दोन काळ्या रंगाच्या बॅग आहेत. तसेच त्या बॅगमध्ये चोरी केलेले मोबाईल आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने ती वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांनी खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यांच्याकडील दोन बॅगा ताब्यात घेऊन तपासल्या असता त्यामध्ये एकूण ८४ मोबाईल फोन सापडले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, आबा उत्तेकर, पो.हवालदार संजय शिंदे, पोलीस अंमलदार शंकर कुंभार, अमित बोडरे, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोंडे, अमोल पाटील, विकास पांडुळे, विकास बांदल, दिपक शेंडे, सचिन गाढवे, नलिन येरुणकर यांनी केली आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरत असत महागडे मोबाईल...

कर्नाटक राज्यातून आलेली ही टोळी मुख्यतः मार्केटयार्ड भाजी मंडई, स्वारगेट बस स्टॅण्ड, बालाजीनगर, कात्रज भाजी मार्केट, अभिरुची परिसर, वडगाव भाजी मार्केट तसेच पुणे शहराच्या इतर गर्दीच्या ठिकाणी थांबत असत. त्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाईल फोन लंपास करत असत. मागील १० दिवसांपासून ह्या चोरांनी या परिसरात चोरी केली असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीThiefचोरMobileमोबाइलMONEYपैसाPoliceपोलिस