शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

Video : पुण्यात मनसेचे खळखट्याक ! कोंढवा भागातील अ‍ॅमेझॉनच्या ऑफिसची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 3:45 PM

मनसे आणि अ‍ॅमेझॉन वाद चिघळला.

पुणे : मराठी भाषेचा पर्याय अ‍ॅमेझॉनवर असलाच पाहिजे अशी प्रमुख मागणी मनसेने केली होती. मुंबईत विविध ठिकाणी ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ अशा आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स झळकवले होते. तसेच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांना सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय जर उपलब्ध झाला नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ कडक इशारा देखील मनसेकडून दिला गेला होता. मात्र याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाची नोटीस आली. ;त्यानंतर मनसे आणि अ‍ॅमेझॉन वाद आणखी पेटला. त्याचे पडसाद पुण्यात उमटले असून कोंढवा भागात मनसे कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनचे ऑफिसची शुक्रवारी( दि. २५ ) तोडफोड केली.

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करावे. अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते मात्र.राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर अ‍ॅमेझॉनला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा चित्रे यांनी दिला होता.

 

विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. त्यांनी तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले होते.

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यामुळे मनसे आक्रमक

मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या पर्याय वापरण्यासंदर्भात सुरु करण्यात आलेल्या जोरदार मोहिमेला विरोध करण्यासाठी अ‍ॅमेझॉनने न्यायालयात गेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाने नोटीस धाडली. यात राज ठाकरे यांच्यासह ठराविक मनसे सचिवांना ५ जानेवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र मनसेकडून या नोटिशीचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेamazonअ‍ॅमेझॉनmarathiमराठी