मनसेचा नगरसेवक, कार्यकर्ते अटकेत, महावितरण कार्यालय तोडफोड प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:48 IST2017-10-05T06:48:40+5:302017-10-05T06:48:59+5:30

वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निरसन न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली.

MNS corporator, activists detained, Mahavitaran's office breakfight case | मनसेचा नगरसेवक, कार्यकर्ते अटकेत, महावितरण कार्यालय तोडफोड प्रकरण

मनसेचा नगरसेवक, कार्यकर्ते अटकेत, महावितरण कार्यालय तोडफोड प्रकरण

पुणे : वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निरसन न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली. कोंढवा परिसरातील कार्यालयाची मंगळवारी दुुुपारी बाराच्या सुमारास ही तोडफोडीची घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मनसे नगरसेवकासह कार्यकर्त्यांना अटक केली.
नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर (वय ३७) यांच्यासह चंद्रशेखर सुभाष लोणकर (वय ४२), अमित शिरस (वय ३८), सतीश शिरस (वय ३७), कुणाल गोंधळे (वय २६), अमित जगताप (वय ३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहायक अभियंता लिंगाप्पा बाधे (वय ५१, रा. वृंदावननगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात अनेक दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत नव्हता. याप्रकरणी नागरिकांनी तक्रारी करूनही त्याचे निवारण केले जात नव्हते. त्यामुळे बाबर हे कार्यकर्त्यांसह निवेदन घेऊन महावितरणच्या कार्यालयात आले. त्यानंतर बाधे यांच्या कक्षात येऊन ‘तुम्ही काम करीत नाही. तुमच्यामुळे लोकांना त्रास होतो,’ असे बोलून कक्षातील काचा, प्रिंटर, फोन या वस्तू लाकडी दांडक्याने तोडल्या.
तसेच, कार्यालयात असणाºया वस्तू इतरत्र फेकून देऊन सव्वादोन लाखांचे नुकसान करून बाधे व महावितरणचे कर्मचारी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. सहायक पोलीस निरीक्षक पावसे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: MNS corporator, activists detained, Mahavitaran's office breakfight case