शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी केली पक्षकार्यकर्त्यांना दमबाजी

By admin | Updated: January 26, 2015 01:20 IST

कोणाला विचारून तुम्ही उपोषणाला बसलात? पक्ष काय तुमच्या बापाचा आहे काय रे? फटकून काढीन! स्वत:ला काय समजता?

जुन्नर : कोणाला विचारून तुम्ही उपोषणाला बसलात? पक्ष काय तुमच्या बापाचा आहे काय रे? फटकून काढीन! स्वत:ला काय समजता? चला तेथून चालू पडा, तुम्हाला आमदार खेळणे वाटले काय? अशा भाषेत एका पक्षाच्या आमदाराने आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोबाईलवरून दमबाजी करण्याचा प्रकार नुकताच घडला असून, या घटनेमुळे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दमबाजीचे व्हाईस रेकॉर्डिंग सध्या व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत असून, याबाबत जोरदार उलटसुलट चर्चा होत आहे. आपला माणूस साधा माणूस, असे जनतेला सांगून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे महाशय निवडून आले आहेत. या आमदार साहेबांच्या मतदारसंघातील एका गावातील समाजमंदिराची जागा पाडण्यात आल्याने स्थानिक काही कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी याबाबत संबंधित विभागाकडे दादही मागितली होती. मात्र, अधिकारी दाद देत नसल्याने त्यांनी तालुक्याच्या गावी उपोषणाचा निर्णय घेतला व काही कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसले. उपोषणाला आपण का बसलोत, हे लोकांना समजावे म्हणून त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘दिलसे’ विचार करून पक्षाचा नावाचा फलकही लावला. दरम्यान, उपोषणाची बातमी आमदार महोदयांच्या कानावर गेली आणि त्यांचे पित्तच खवळले. मी एकमेव पक्षाचा आमदार असताना मला न विचारता हे कार्यकर्ते उपोषणाला कसे बसू शकतात? मग काय या साहेबांनी खिशातून मोबाईल काढून लगेच उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांना झापायला सुरुवात केली. वास्तविक साध्या व सोप्या भाषेतून कार्यकर्त्यांना समज देऊन उपोषण सोडायला ते भाग पाडू शकत होते. मात्र, तसे त्यांनी न करता कार्यकर्त्यांवर शब्दांची फायरिंग सुरू केली. (वार्ताहर)