आमदार राहुल कुल हल्ला निषेधार्थ रावणगावला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:25 IST2018-10-04T00:25:22+5:302018-10-04T00:25:43+5:30
रावणगाव (ता. दौंड) ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्यावर खुनी हल्ल्याचा कट रचल्याच्या निषेधार्थ बुधवारी

आमदार राहुल कुल हल्ला निषेधार्थ रावणगावला बंद
रावणगाव : रावणगाव (ता. दौंड) ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्यावर खुनी हल्ल्याचा कट रचल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि.३) संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. या वेळी निषेधसभा घेऊन खुनी हल्ल्याचा कट रचल्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, याबाबतचे लेखी निवेदन रावणगाव पोलिसांना देण्यात आले.
या वेळी भीमा-पाटस कारखान्याचे माजी संचालक संपत आटोळे, रावणगावचे माजी सरपंच गेनदेव आटोळे आणि लक्ष्मण रांधवन आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी रावणगावचे विद्यमान सरपंच धनाजी आटोळे, मानसिंग गाढवे, शिवाजी आटोळे, संजय गाढवे, हौशीराम आटोळे, दिनकर आटोळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.