शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्यापासून बेपत्ता आईला शोधण्यात आले यश! मातृदिनाच्या दिवशी घरात सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 13:19 IST

सोशल मीडिया ठरला आशेचा किरण

ठळक मुद्देशूरवीर लहुजी तांडव सेनेच्या मदतीने शोधले आईला

पुणे: औंध येथे राहणारी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होती. पुण्यात गोरगरीब आणि गरजूंना अन्न वाटप करणाऱ्या शूरवीर लहुजी तांडव सेनेच्या मदतीने या महिलेला शोधण्यास यश आले. एक महिन्यापासून बेपत्ता असणारी आई मातृदिनाला कुटुंबात सुखरूप आली. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती सेनेचे प्रमुख विनोद शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

संगीता तुपसुंदर असे ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. औंध भागातील झोपडपट्टीत त्या आपल्या परिवारासोबत राहतात. ४ एप्रिलला संगीता या पेन्शन आणण्यासाठी शिवाजीनगरला गेल्या होत्या. खूप वेळ होऊनही त्या घरी आल्या नाहीत. त्यांच्या कुटुंबात दोन मुलांची वेगळी घरे आहेत. संगीता ज्या मुलाकडे राहतात. त्याला आई भावाकडे गेली असल्याचे वाटू लागले. त्याने एक दिवस वाट बघितल्यावर भावाकडे आईबद्दल चौकशी केली. तेव्हा भावाने माझ्याकडे आली नसल्याचे सांगितले. कुटुंबाची शोधमोहिमेस सुरुवात झाली. संगीता यांचे पती पोलीस कर्मचारी होते. त्यामुळे तातडीने पोलिसांनी पाऊले उचलण्यास सुरुवात केली. परंतु आईंचा शोध लागत नव्हता.

कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत शूरवीर लहुजी तांडव सेना गरिबांना अन्नदान करत होती. ते अन्न वाटप करताना फोटो काढून सोशल मीडियावर टाकत होते. या संस्थेचे व्हाट्स अँपवर जवळपास ५२ ग्रुप आहेत. तर एका ग्रुपमध्ये २०० ते २५० च्या आसपास सदस्य आहेत. शिवाजीनगर स्टेशनवर अन्न वाटप करताना त्यांनी संगीता यांच्याबरोबर काढलेला फोटो आपल्या सर्व ग्रुपमध्ये व्हायरल केला. तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत हा फोटो पोहोचला. तुपसुंदर यांनी संस्थेशी संपर्क साधून आईला घरी आणले.

डिसेंबर महिन्यात झाले मुलीचे निधन

संगीता यांच्या मुलीचे डिसेंबर २०२० मध्ये निधन झाले होते. मुलीच्या निधनाने त्या नैराश्यात होत्या. म्हणूनच त्या सोडून गेल्या असतील. असे कुटुंबीयांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याshivajinagar-acशिवाजीनगरAundhऔंधSocialसामाजिक