शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड: अल्पवयीन मुलांना लागला गाडी चोरण्याचा नाद, चोरीत मुलींचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 17:37 IST

पिंपरी: अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे ही मागील काही वर्षांपासून मोठी समस्या बनली आहे. विशेषत: शहरी भागात बाल गुन्हेगारीचे प्रमाण ...

पिंपरी: अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे ही मागील काही वर्षांपासून मोठी समस्या बनली आहे. विशेषत: शहरी भागात बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चालू वर्षात गुन्हेगारी कृत्य केल्याप्रकरणी १३५ अल्पवयीन मुलांवर ११० गुन्हे दाखल आहेत. दाखल झालेल्या गुन्हांमध्ये सर्वाधिक वाहन चोरीप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. वाहन चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांवर ४० गुन्हे दाखल आहे. यामध्ये ३१ मुलांचा समावेश होता.

यामध्ये १८ मुलांवर गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १३ गुन्हे दाखल झाले असून, याप्रकरणी २६ मुलांवर गुन्हे दाखल आहेत. बलात्कार केल्याप्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले. तर याप्रकरणी ९ मुलांवर गुन्हे दाखल झाले. चोरीप्रकरणी २० गुन्हे दाखल झाले असून, १७ मुलांवर गुन्हा दाखल आहे. दरोडा आणि जबरी चोरीप्रकरणी २१ गुन्हे दाखल झाले; तर ३४ मुालंवर याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

चोरीत मुलींचा समावेश-

वाहन चोरीप्रकरणी ४० गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये ३१ मुलांचा समावेश आहे. वाहन चोरीप्रकरणी गु्न्हा दाखल झालेल्या ३१ मुलांमध्ये एका मुलीचा समावेश आहे, तर चोरीप्रकरणी १७ मुलांवर गुन्हे दाखल झाले आहे. यामध्येदेखील एका मुलीचा समावेश आहे. यावरून मुलांबरोबर मुलीही गु्न्हेगारीकडे वळत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आगामी काळात मुलींनी गुन्हेगारीकडे वळू नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

अल्पवयीन मुलांना कायद्याची जाणीव नसते. त्यामुळे ते गुन्हेगारी कृत्याकडे वळतात. मुलांना कायद्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी आपल्या मुलांचा कोणी वापर करत आहे का? याची माहिती पालकांनी घ्यावी. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने अशा मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रकल्प राबविले जातात. तसेच मुलांनी गु्न्हेगारीकेड वळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.- डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीbikeबाईकtwo wheelerटू व्हीलर