शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

हनुमान टेकडीवर अल्पवयीन मुलीला लुटले;टेकडीवर लुटण्याची तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 19:10 IST

या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : हनुमान टेकडीवर मित्रासमवेत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन १७ वर्षीय मुलीला चोरट्यांनी लुटले. मित्राला कोयत्याचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी लंपास करून चोरटे पसार झाले. हनुमान टेकडी परिसरात घडलेली ही लुटमारीची तिसरी घटना आहे.याबाबत अल्पवयीन मुलीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ४) दुपारी दोनच्या सुमारास मुलगी आणि तिचा मित्र सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी मुलगी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला धमकावून शिवीगाळ केली. त्यांना काेयत्याचा धाक दाखविला.

अल्पवयीन मुलीला मारहाण करुन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरून नेली. घाबरलेली मुलगी आणि तिचा मित्र तेथून घरी गेले. मुलगी घाबरली होती. त्यानंतर तिने सोमवारी (दि. ६) डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रThiefचोरPoliceपोलिसArrestअटकChain Snatchingसोनसाखळी चोरी