अल्पवयीन मुलीवर मंदिरात बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:41 AM2018-06-14T01:41:45+5:302018-06-14T01:41:45+5:30

गेल्या महिन्यात खडकी येथील एका मंदिरातील पुजाऱ्याने जवळच्या घरातील अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर पिंपरी येथील खराळवाडी भागात असलेल्या एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

 Minor girl raped in the temple | अल्पवयीन मुलीवर मंदिरात बलात्कार

अल्पवयीन मुलीवर मंदिरात बलात्कार

Next

पिंपरी - गेल्या महिन्यात खडकी येथील एका मंदिरातील पुजाऱ्याने जवळच्या घरातील अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर पिंपरी येथील खराळवाडी भागात असलेल्या एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (दि. ९) भरदिवसा घडली असून, अत्याचार करणाºया रोहन भांडेकर (वय १८, रा. पिंपरी) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आठवर्षीय पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास खराळवाडी येथील एका मंदिरात खेळण्यासाठी गेली होती. आरोपीने तिला मंदिरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने हा प्रकार घरी जाऊन आईला सांगितला. त्यावरून आईने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  Minor girl raped in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.