पानसरेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:07 IST2018-08-23T20:06:38+5:302018-08-23T20:07:50+5:30
माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु मला आवडतेस. मात्र, याबाबत कोणाला काहीही सांगायचे नाही असा दम देत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पानसरेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
सुपे : माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु मला आवडतेस. मात्र, याबाबत कोणाला काहीही सांगायचे नाही असा दम देत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पानसरेवाडी (ता. बारामती) येथील बोबडेमळ्या नजीक घडली.
संजय दिपक दिवेकर (वय २१, रा. पानसरेवाडी, बोबडेमळा) यास बाल लैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक फौजदार के. बी. मोरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला घरात एकटे असल्याचे पाहून आरोपीने वेळोवेळी बलात्कार केला. त्याला गुरुवारी (दि. २३) सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भातील अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक आर. एन. साळुंके करत आहेत.