शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

माळेशज घाटात मिनीबसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST

: आंब्याचे वळण येथे झाला अपघात लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माळशेज घाटात आंब्याचे वळण येथे एका मिनीबस चालकाचा ...

: आंब्याचे वळण येथे झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : माळशेज घाटात आंब्याचे वळण येथे एका मिनीबस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला धडकून अपघात झाला. या घटनेत १४ प्रवासी जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रामावतार बाबूलाल शहा (वय ५१) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नगरहून प्रवाशांना घेऊन एक मिनीबस कल्याणला जात होती. ही बस माळशेज घाटातील आंब्याचे वळण येथे असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ही मिनीबस येथील रस्त्याच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने बस घाटात कोसळली नाही. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. अपघातात बसमधील १४ प्रवासी जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला.

सर्व रहिवासी उल्हासनगर जिल्हा ठाणे येथील आहेत. राजेंद्र प्रसाद शहा (वय ६९), सुनीता राजेंद्र शहा (वय ५४), मुन्नी जवाहरलाल शहा (वय ४५), खुशबू अजित शहा (वय ३२), राधा उत्तम शहा (वय ३४), कुसुम रामावतार शहा (वय ४५), संतोष अश्रू नरवडे (वय २१), मनोज प्रसाद शहा (वय ५०), मुरलीप्रसाद रामेश्वर शहा (वय ५०), शारदा मुन्नेश्वर शहा (वय ५०), मुन्नेश्वर शहा (वय ५४), तुन्नी मनोज प्रसाद शहा (वय ४२), कविता मुरलीप्रसाद शहा (वय ४७), उत्तम कुमार शहा (वय ३८) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर आळेफाटा येथे उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याचे समजताच टोकवडा पोलीस ठाण्याचे एपीआय एस. एच. खरमाटे यांच्या नेतृत्वाखाली एच. सी. बढे, पी. के. बगाड, ननवरे , बांगर, डोंगरे मतकर यांनी तत्काळ जखमींना मदत दिली. चालक संतोष नरवडे याच्यावर टोकवडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.