शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 14:56 IST

पुरंदर तालुक्यातील मौजे झेंडेवाडी येथील ज्वाला मंदिरात मिलिंद एकबोटे  हे कार्यकर्त्यांसह देवदर्शन व प्रवचनासाठी गेले होते.

पुणे : गो रक्षक म्हणून गो शाळा चालविण्यावरुन झालेल्या वादातून समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना गो रक्षकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली़. ही घटना पुरदंर तालुक्यातील झेंडेवाडी येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला़. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित मोडक व विवेक मोडक हे वडकीमध्ये हंबीरराव मोहिते गो शाळा चालवितात़. गो रक्षा संबंधी एक महिन्यापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती़. तेव्हा मिलिंद एकबोटे यांना सबुरीने घेण्यास सांगितले होते़. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता़. पुूरंदर तालुक्यातील मौजे झेंडेवाडी येथील ज्वाला मंदिरात मिलिंद एकबोटे  हे कार्यकर्त्यांसह देवदर्शन व प्रवचनासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम संपल्यानंतर ते जवळच असलेल्या शनि मंदिरासमोर जेवणासाठी बसले असताना तेथे पंडित मोडक , विवेक  मोडक , निखिल दरेकर हे ४० ते ५० लोकांचा जमावासह  आले. पंडित मोडक यांनी एकबोटे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत सासवड मध्ये राहायचे नाही अशी धमकी दिली.  तसेच एकबोटे यांना मारहाण केली़. अभिषेक वाघमोडे याच्या हातावर चाकून चाकूने वार केला़. प्रतिक गायकवाड याला देखील जमावाने मारहाण करुन डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न केला़. आपल्यावर असलेल्या रागातून पंडित मोडक, विवेक मोडक यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली़.  या गुन्हयाचा तपास सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.बी.घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलीस करत आहे. 

टॅग्स :PurandarपुरंदरMilind Ekboteमिलिंद एकबोटेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचार