शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची मेट्रो वेळेआधी सुरू होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 18:10 IST

प्रदूषण असंच वाढत राहिले तर पुणे हे सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जाऊ लागेल. म्हणून सार्वजनिक वाहतूक महत्वाची आहे

ठळक मुद्देपुण्यातील मल्टीमोडल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब चे भूमिपूजन तसेच स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे उदघाटन येत्या काळात पाच मिनिटात पीएमपी बस उपलब्ध होईलनॉन एसी च्या भाड्यात पुणेकरांना एसी बसने फिरता येणार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मार्ट सिटी मिशन सुरू केले. त्या मिशन संदर्भात पुण्यासाठी घेतलेले सर्व निर्णय प्रगतीपथावर आहे. तसेच त्या मिशनमधील एक महत्वाचा घटक असलेली पुण्याच्या मेट्रोचे काम देखील प्रचंड वेगात सुरु आहे. त्यामुळे पुणेमेट्रो वेळे आधी सुरू होईल असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्यातील मल्टीमोडल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब चे भूमिपूजन तसेच स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, मानवसंसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे,  महापौर मुक्ता टिळक, पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, शहरांमुळे जीडीपी वाढते. शहरात सर्व सुविधा मिळायला हव्यात हे लक्षात घेऊन स्मार्ट सिटी मिशन सुरू केले. पुण्यासाठी घेतलेले सर्व निर्णय प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच काम लवकर पूर्ण होईल याची मला खात्री आहे. पुणे हे वाहनांचा आगार झाले आहे. वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण असंच वाढत राहिले तर पुणे हे सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जाऊ लागेल. म्हणून सार्वजनिक वाहतूक महत्वाची आहे. आणि त्यासाठी इंटिगरेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टिम तयार करण्यात येत आहे. पुण्यात मेट्रो चं जाळ निर्माण होत आहे. ५ मिनिटाहुन अधिक वेळ बसची वाट पाहावी लागली नाही तरच लोक बसने प्रवास करतील. त्यामुळे येत्या काळात पाच मिनिटात बस उपलब्ध होईल.पीएमपी ने १५०० बसेस पारदर्शक पद्धतीने खरेदी केल्या आहेत. नॉन एसी च्या भाड्यात पुणेकरांना एसी बसने फिरता येणार आहे. स्वारगेट मध्ये सर्व प्रकारच्या ट्रान्सपोर्ट सिस्टिम ला सामावून घेण्यासाठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभे राहणार आहे. सिंगल आप आणि सिंगल तिकीट यंत्रणा उभी करायची आहे.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMetroमेट्रोPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे