शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

पुण्यातील २०१९ च्या पुराला 'मेट्रो' जबाबदार ; जलसंपदाचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 12:24 IST

वारंवार सांगितल्यानंतरही पावसाळ्यापूर्वी हा भराव न काढल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देपुणे पाटबंधारे मंडळाचे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कार्यकारी संचालकांना पत्र

पुणे : मेट्रोच्या बांधकामासाठी डेक्कन येथे नदीपात्रात तसेच मुळा मुठा संगमाजवळ मोठा भराव न काढण्यामुळे २०१९ मधील पावसाळ्यामध्ये खडकवासला धरणातून कमी विसर्ग सोडला असताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण झाल्यामुळे नदीच्या पुर पातळीपर्यंत पाणी येऊन पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मेट्रोला अनेकदा सांगूनही त्यांनी हा भराव न काढण्यापूर्वीपुणे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या पुराला मेट्रो जबाबदार असल्याचा ठपका जलसंपदा विभागाने मेट्रोवर ठेवला आहे.जलसंपदा विभागाने मेट्रोला पाठविलेल्या पत्रात पूराला जबाबदार ठरविले आहे. २०१९ मध्ये मुठा व मुळा नदीला किमान दोनदा पूर आला होता. डेक्कन परिसरातील अनेक भाग जलमय झाले होते. याबाबत हरित लवादाकडे याचिकाही करण्यात आल्या होत्या. जलसंपदा विभागाने २०१९ च्या पावसाळ्यापूर्वी मुठा नदीपात्रातील भराव काढण्याबाबत पत्राद्वारे कळविले होते. वारंवार सांगितल्यानंतरही पावसाळ्यापूर्वी हा भराव न काढल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आता जलसंपदाने पुन्हा एकदा मेट्रोला पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आगामी पावसाळा सुरु होण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत आपल्या स्तरावरुन मेट्रो रेल बांधकाम करताना नदीपात्रात करण्यात आलेले भराव/ प्लॅटफॉर्म तातडीने काढून टाकण्यात यावेत. जेणेकरुन नदीच्या पूरवहन क्षेत्रातील अडथळा दूर होऊन पुरसदृश परिस्थिती निर्माण होणार नाही. मेट्रो रेल बांधकाम करताना नदीपात्रात करण्यात आलेले भराव/ प्लॅटफॉर्म वेळीच काढले नाहीत तर, त्यामुळे उद्भवणार्‍या पूर परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर राहणार असल्याचा इशारा जलसंपदाने दिला आहे. पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कार्यकारी संचालकांना हे पत्र पाठविले आहे. 

टॅग्स :PuneपुणेfloodपूरRainपाऊसWaterपाणीMetroमेट्रो