शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचे खांब सोडेनात, सहा चोरट्यांना अटक; सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड

By नितीश गोवंडे | Updated: January 12, 2025 18:53 IST

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळा परिसरात मेट्रोचे साहित्य ठेवण्यात आले आहे..

पुणे : शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरातून मेट्रोचे दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना अटक केली. गणेश मच्छिंद्र कांबळे (४८), अनिकेत महेंद्र कांबळे (२७), तौसिफराज फैजअहमद शेख, शमशुद्दीन युसुफअली शेख मन्सुरी (सर्व रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर), वसीम अयुब पठाण (३२, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) आणि मुस्तफा मुस्तकीम शेख (३५, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार (५१, रा. थेरगाव, चिंचवड) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळा परिसरात मेट्रोचे साहित्य ठेवण्यात आले आहे, दोन दिवसांपूर्वी कांबळे, शेख, मन्सुरी, पठाण यांनी कामगार पुतळा परिसरात ठेवलेले दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरले.एका वाहनात भरून ते भंगारात विक्री करणार होते. मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार यांनी त्यांना हटकले. आरोपी लाेखंडी खांब चोरून नेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती मेट्रोचे अधिकारी, तसेच पोलिसांना दिली. सहा जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक कविराज पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोArrestअटकPoliceपोलिस