शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

कोरोना काळात युवकाने दिला " बी पॉझिटिव्ह " चा संदेश ; पोलिसांनी पण त्याच्या "या" विधायक कार्याला केला "सॅल्यूट"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 23:00 IST

भूगाव येथील रहिवासी असलेल्या पंकज गुप्ता याची सायकल ही '' पॅशन '' आहे.

ठळक मुद्देसायकलिंगची आवड जोपासण्याबरोबरच रक्तदानाच्या माध्यमातून त्याने सामाजिक बांधिलकी

नम्रता फडणीस- पुणे : एकीकडे कोरोना काळात रिकामटेकडे युवक विनाकारण घराबाहेर पडताना पोलिसांच्या लाठ्यांचे धनी होत आहेत तर दुसरीकडे पुण्यातीलच एका तरूणाने रक्तदानासाठी सायकलवर रूग्णालय गाठत इतर तरूणांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, रक्तदान करून सायकलवरून घरी परत जाताना पोलिसांनी त्याच्या या विधायक कार्याला '' सॅल्यूट'' केला  आहे. यासायकलपटूचे नाव आहे पंकज गुप्ता...    भूगाव येथील रहिवासी असलेल्या पंकज गुप्ता याची सायकल ही '' पॅशन '' आहे. तो ऑफिसला देखील सायकलनेच जातो. सायकलिंगची आवड जोपासण्याबरोबरच रक्तदानाच्या माध्यमातून त्याने सामाजिक बांधिलकी देखील  जपली आहे. आजवर सायकलपटूंनी वेगवेगळ्या मोहिमा पार पाडत पुण्याची मान अभिमानाने उंचावली आहे. आपत्ती काळातही मदतीसाठी पुढाकार घेण्यात सायकलपटू मागे नाहीत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. कोरोना काळात काही बिनकामी युवक मंडळी घराबाहेर पडण्याचे बहाणे शोधत आहेत. अशांना पोलिसांकडून लाठ्यांचा प्रसाद देखील मिळत आहे. पण समाजात पंकज गुप्ता याच्यासारखे काही तरूण असेही आहेत की तेया संकट काळात मदतीसाठी खारीचा वाटा उचलत आहेत. सध्या शहरात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. काही रक्तपेढ्या आणि स्वयंसेवी संस्था रूग्णालयाच्या मदतीने रक्तदान शिबिरे आयोजित करीत आहेत. यासाठी रक्तदात्यांचे व्हॉटस अप ग्रृप देखील तयार करण्यात आले आहेत. यासंदर्भात पंकज गुप्ता याने '' लोकमत'' ला सांगितले की,  गिरीप्रेमी आणि श्रीस्वरूप सेवा संस्था यांनी तयार केलेल्या ग्रृपला मी जॉईन झालो. त्यावेळी दोनखासगी रूग्णालयांना ''बी पॉझिटिव्ह'' रक्ताची गरज होती. त्यामुळे मला त्यातील एका रूग्णालयामध्ये जाण्यास सांगण्यात आले. याकरिता मी पुणे पोलिसांच्या व्हॉटअप ग्रृपला पाससाठी अर्ज केला आणि रक्तदाता असल्याचे सांगितले. पोलिसांनी माझा अर्ज तात्काळ मंजूर केला. त्यावेळी वैयक्तिक वाहन वापरायला बंदी होती. त्यामुळे मी सायकलवरून गेलो. भूगाव ते चांदणीचौक, पौड फाटा, अभिनव चौक मार्गे दीनानाथ मंगेशकर गाठले. तिथे गेल्यावरमाझी थोडीफार चौकशी केली. माझी माहिती लिहून घेतली. कोव्हिडचा स्पेशल्फॉर्म भरून घेतला. कुठल्या परदेशाहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातआलेला नाही ना? अशी विचारणा झाली. त्यानंतर मग रक्तदान केले. रक्तदानकेल्यानंतर भूगावला जाताना पोलिसांनी अडवले आणि त्यांना '' कॉल ब्लड डोनर''आहे असं सांगितल्यावर त्यांनी कौतुक केले. आपण इतरांच्या मदतीला उपयोगी पडत आहोत याचाच आनंद अधिक होता. त्यामुळे रक्तदान करून सायकल चालविताना कोणताही त्रास जाणवला नाही.----------------------------------

टॅग्स :PuneपुणेBlood Bankरक्तपेढीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस