शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

मेरे पास बच्चन है...!; पुण्याच्या बालरंजनमध्ये उलगडला अमिताभ यांचा संघर्षमय जीवनप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 2:51 PM

नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. निमित्त होते बालरंजन केंद्राच्या ३०व्या वर्धापनिदिनाचे. अमिताभ यांच्या पंच्चाहत्तरीचे औचित्य साधून त्यांनी बच्चन यांचे संघर्षमय जीवन मुलांसमोर उलगडण्याचे ठरवले.

ठळक मुद्दे निमित्त होते बालरंजन केंद्राच्या ३०व्या वर्धापनिदिनाचेसगळे काही संपले असे असतानाच फिनिक्स पक्षाप्रमाणे कौन बनेगा करोडपती मधून घेतली उभारी

पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या अमिताभ बच्चन यांचा शालेय मुलांवरही जबरदस्त पगडा आहे. त्याचेच प्रत्यंतर बालरंजन केंद्रांच्या संयोजकांना आले. मुलांसाठी म्हणून त्यांनी अमिताभ यांच्या पंच्चाहत्तरीनिमित्त त्यांनी आयोजित केलेल्या बच्चन यांच्या कारकिर्दीच्या आढाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाले. इतका की त्यानंतर सगळीच मुले मेरे पास बच्चन है असे म्हणतच घरी गेली.नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. निमित्त होते बालरंजन केंद्राच्या ३०व्या वर्धापनिदिनाचे. अमिताभ यांच्या पंच्चाहत्तरीचे औचित्य साधून त्यांनी बच्चन यांचे संघर्षमय जीवन मुलांसमोर उलगडण्याचे ठरवले. त्यांना सिद्धार्थ केळकर यांची साथ मिळाली. मुलांसमोर त्यांनी मोजक्याच शब्दात बच्चन यांना उभे केले. मुलांनीही त्यांना मनोमन दाद दिली.अमिताभ याचा अर्थ सूर्य! त्याचे सुरूवातीचे दिवस, चित्रपटसृष्टित लंबूटांग्या म्हणून झालेली मानहानी, ज्या आवाजाच्या सामर्थ्यावर त्यांनी सर्व काही कमावले, तोच आवाज आकाशवाणीने एकेकाळी चांगला नाही म्हणून नाकारला होतो हे ऐकून मुले आश्चर्यचकित झाली. कोणीही खचून जाईल अशा या अवस्थेतून बच्चन यांनी अखेर चित्रपटसृष्टी कशी काबीज केली यातून मुलांनाही चांगली प्रेरणा मिळाली.सगळे काही संपले असे असतानाच फिनिक्स पक्षाप्रमाणे कौन बनेगा करोडपती मधून त्यांनी कशी उभारी घेतली व त्या लहान पडद्यावरही ते कसे एकमेव ठरले हेही केळकर यांनी मुलांना सांगितले. सहस्त्रुबद्धे म्हणाल्या, प्रसिद्ध व्यक्तींचे फक्त ग्लॅमर समाजाला दिसते, पण त्यामागची मेहनत आज समजली. पल्लवी गोखले व शौनक केळकर यांनी सिद्धार्थ केळकर यांना सादरीकरणात सहकार्य केले. माधवी केसकर यांनी आभार  मानले.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनPuneपुणे