डोक्यात दगड घालून माथेफिरूने केला वृद्धाचा खून ; बारामतीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 19:56 IST2020-04-19T19:55:25+5:302020-04-19T19:56:51+5:30
माथेफिरुच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामती येथे घडली आहे.

डोक्यात दगड घालून माथेफिरूने केला वृद्धाचा खून ; बारामतीतील घटना
बारामती : बारामती शहरात एका वृद्धाच्या डोक्यात माथेफिरूने दगड घालून खून केल्याची घटना रविवारी (दि 20) सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी त्या माथेफिरूला ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,सोपान सावळाराम जगताप (वय ७०, रा. संत सेना महाराज नगर,कसबा, बारामती) असे या वयोवृद्ध नागरिकाचे नाव आहे. शहरातील कसबा भागात क-हा नदीच्या पात्रात ही घटना घडली. शहर पोलिसांनी गणेश मारुती कुंभार (वय ३२) या माथेफिरुला ताब्यात घेतले आहे. शहरातील अप्पासाहेब पवार मार्गावरुन क-हा नदीच्या जुन्या पुलावरुन जगताप हे कसब्यातील मशिदीच्या बाजूकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या कुंभार याने त्यांना नदी पात्रात ढकलले .तसेच तेथे पडलेला दगड उचलून जगताप यांच्या डोक्यात घातला.याबाबत माहिती समजल्यानंतर घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी जगताप यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र , उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कुंभार याने गेल्या काही महिन्यांपासून कसबा भागात रात्रीच्या अंधारात दबा धरुन हल्ला करणे, दगड भिरकावणे अशी कृत्ये केल्याची माहिती पुढे येत आहे या घटनमुळे शहरात खळबळ उडाली आहे .