शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

राजा केळकर संग्रहालय आणि जर्मन सरकार यांच्यात सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:09 IST

पुणे : ‘ग्रीन, क्लिन अँड स्मार्ट म्युझियम’ या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या प्रकल्पाला जर्मनीच्या बर्लिन येथील फेडरल फॉरेन ...

पुणे : ‘ग्रीन, क्लिन अँड स्मार्ट म्युझियम’ या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या प्रकल्पाला जर्मनीच्या बर्लिन येथील फेडरल फॉरेन आॅफिस आणि मुंबई येथील जर्मन दूतावासाने मंजुरी दिली आहे. याअंतर्गत राजा दिनकर केळकर संग्रहालयाला ४० लाख रुपयांचे अर्थसाह्य मंजूर झाले आहे. मुंबई येथील जर्मन कॉंंन्स्युलेटचे कॉन्स्युल जनरल डॉ. ज्युरगन मोरहार्ड आणि राजा केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे संग्रहालय आधुनिक होण्यास मदत होणार आहे.

जर्मनीशी अर्धशतकाहून अधिक काळ संबंध सामंजस्य करारामुळे जर्मन सरकार आणि संग्रहालय यांच्यातील गेल्या अर्धशतकापासून असलेला ऋणानुबंध दृढ झाला असल्याची भावना सुधन्वा केळकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, संग्रहालय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जर्मन सरकारने १९६७ मध्ये संग्रहालयाचे संस्थापक डॉ. दिनकर केळकर यांना गौरविले होते. डॉ. केळकर आणि डॉ. हरिभाऊ रानडे या दोघांना जर्मनीतील संग्रहालये पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. बर्लिन येथील जर्मनी फेडरल आॅफिसने २००७-२००८ मध्ये ‘ब्रिग्रिंग इंडियाज हेरिटेज टू द वर्ल्ड’ या उपक्रमांतर्गत राजा केळकर संग्रहालयाला भरीव मदत केली होती. वस्तूंच्या जतनासाठी उच्च दर्जाची उपकरणे, वस्तू प्रदर्शनासाठी उपयुक्त अशी २० कपाटे (शोकेस) आणि एलईडी विद्यत व्यवस्था या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होता. पुण्याचे भगिनी शहर असलेल्या ब्रेमेन येथील ओव्हरसिज संग्रहालयासमवेत राजा केळकर संग्रहालयाची माहितीची देवाणाघेवाण झाली आहे.

.............................................................

डॉ. दिनकर गंगाधर केळकर या एका व्यक्तीने संकलित केलेल्या दुर्मीळ वस्तूंचे संकलन हे राजा केळकर संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे. संग्रहालयामध्ये २३ हजारांहून अधिक दुर्मीळ वस्तूंचा संग्रह आहे. ‘स्मार्ट म्युझियम’ अंतर्गत वस्तू प्रदर्शनाचा दर्जा सुधारणे, संग्रहालयाचे संकेतस्थळ अद्यायावत करणे, मोबाइल अ‍ॅप विकसित करणे आणि ‘थ्री-डी व्हर्च्युअल टूर’ व्यापक स्तरावर विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी जर्मन फेडरल फॉरेन आॅफिसकडून मिळालेल्या निधीचा विनियोग करण्यात येणार असल्याचे रानडे यांनी सांगितले.

--------------------------------