शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पुणे खंडपीठाबाबत मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 2:18 PM

 पुणे येथील खंडपीठाबाबात अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिवेशन काळात येत्या शुक्रवारी किंवा बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी पुणे बार असोसिएशनला दिले.

ठळक मुद्दे पीएमआरडीएकडे खंडपीठासाठीच्या १०० एकर जागेची मागणी करण्यात येणारन्यायालयाच्या परिसरात आवश्यक त्या नागरी सुविधांची तातडीने उपलब्धता करुन देण्यात येईल

पुणे खंडपीठाबाबत मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक पालकमंत्र्यांचे पुणे बार असोसिएशनला आश्वासन पुणे:  पुणे येथील खंडपीठाबाबात अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिवेशन काळात येत्या शुक्रवारी किंवा बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी पुणे बार असोसिएशनला दिले. पी.एम.आर.डी.ए. कडे पुणे उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी १०० एकर जागेची मागणी करणार असल्याचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले. तसेच न्यायालयाच्या परिसरात आवश्यक त्या नागरी सुविधांची तातडीने उपलब्धता करुन देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे बार असोसिएशनला दिले.   पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी पुणे बार असोसिएशनसोबत पुण्यातील खंडपीठाविषयी चर्चा करण्यासाठी सर्किट हाऊस येथे बैठक  आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पुणे बार असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार, उपाध्यक्ष अ‍ॅड.भूपेंद्र गोसावी,  अ‍ॅड.रेखा करंडे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर, अ‍ॅड. हेमंत झंजाड, अ‍ॅड. संतोष घुले, अ‍ॅड. दत्ता भाडळे आदी उपस्थित होते.     गेल्या महिन्यात राज्य सरकारने  मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर खंडपीठाला मान्यता देत खंडपीठासाठी जागा, तसेच १०० कोटींची तरतूद देखील देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवाजीनगर न्यायालय परिसरात वकिलांमध्ये एकच गोंधळ व अस्वस्थता पसरली. त्यानंतर पुण्याला खंडपीठ न दिल्याच्या निषेधार्थ सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर एकदिवसीय बहिष्कार टाकला होता. तसेच पालकमंत्र्यांनी न्यायालयात उपस्थित राहत राज्य सरकारची पुणे खंडपीठाविषयीची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचे कारण सांगत सदर खंडपीठाविषयी चर्चा सध्या करणे शक्य नसल्याचे सांगत स्वत:हून चर्चेला बोलवणार असल्याचे पत्रांद्वारे बार असोसिएशनला कळविले होते. त्यानुसार ही शनिवारची बैठक बोलाविण्यात करण्यात आली होती. ................................  पालक मंत्र्यांसोबत झालेल्या एक तासाच्या बैठकीत पुणे खंडपीठाविषयीचे सकारात्मक भूमिका असल्याचे संगितले. त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत पुणे येथील शिष्टमंडळाशी अधिवेशन काळातील येत्या शुक्रवारी किंवा पुढील आठवड्यात बैठक घडवून आणणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच पीएमआरडीएकडे खंडपीठासाठीच्या ११ एकर जागेची मागणी करण्यात येणार आहे. न्यायालय परिसरातील  पार्कींग, स्वच्छतागृह, उपहारगृह,सीसीटीव्ही, यांसारख्या नागरी सुविधा लवकरात लवकर पुरविण्यात येतील असे सांगितले.                     अ‍ॅड. सुभाष पवार, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgirish bapatगिरीष बापटPMRDAपीएमआरडीए