शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

निरोपाची सभा १४ मार्चला

By admin | Updated: March 10, 2017 05:08 IST

काही पराभूत तर काही जिंकलेले. महापालिका निवडणुकीने त्यांच्यात हे अंतर पडले, पण सारेच मावळत्या सभागृहाचे सदस्य. निरोपाच्या सभेसाठी महापालिकेत गुरुवारी

पुणे : काही पराभूत तर काही जिंकलेले. महापालिका निवडणुकीने त्यांच्यात हे अंतर पडले, पण सारेच मावळत्या सभागृहाचे सदस्य. निरोपाच्या सभेसाठी महापालिकेत गुरुवारी जमले, पण निरोपाची ही सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे साऱ्यांचीच निराशा झाली. अखेरीस सभागृहाबाहेरच्या लॉबीत, पदाधिकाऱ्यांच्या दालनात व नंतर महापालिकेच्या आवारात गप्पांचे फड जमवून त्यांनी ही हौस भागवली.निरोपाच्या या सभेसाठी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे हे प्रमुख पदाधिकारी तसेच जवळपास ४० नगरसेवक जमा झाले होते. त्यांच्यातील काहीजण सभागृहात बसलेही. मात्र गणपूर्ती होत नसल्याचे कारण देत सभा तहकूब करण्याचा निर्णय महापौर जगताप यांनी दिली. १४ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता सभा होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बरोबर त्याच दिवशी या सभागृहाची मुदत संपुष्टात येत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ मार्चला महापालिकेचे १३ वे सभागृह अस्तित्त्वात येईल व त्यात ५६ व्या महापौरांची निवड होईल.दरम्यान सभा तहकूब झाल्यामुळे जमलेल्या मावळत्या नगरसेवकांची निराशा झाली. त्यांनी मग उपमहापौर, महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनात गप्पांचा फड जमवला. उपमहापौरांच्या दालनात त्यांच्यासह नव्याने निवडून आलेले नगरसेवक दीपक मानकर, महेंद्र पठारे, संजय बालगुडे, दत्ता सागरे आदी जमले होते. महापौरांच्या दालनातही अशीच मैफली जमली होती.(प्रतिनिधी)बहुतेक ठिकाणच्या गप्पांचा सूर मतदान यंत्रांद्वारे फसवणूक करता येते का, हाच होता. त्यात कोणाला किती मते पडली, इतकी मते पडलीच कशी व फक्त इतकीच मते मिळणे शक्य नाही, अशा दोन्ही बाजू बोलल्या जात होत्या. मुख्य इमारतीच्या आवारातही अनेक नगरसेवक जमून गप्पा मारत होते. त्यातही मतदान यंत्रांबद्धल तक्रार करण्यात येत होती. निवडणुकीत विजय मिळालेले नगरसेवक पराभूत नगरसेवकांच्या दु:खावर फुंकर मारत होते. महिला नगरसेवकांमध्येही हीच चर्चा होती. त्यातील काहीजणींना यायला उशीर झाला. सभागृहात वर जाण्याची त्यांची घाई पाहून काही महिला नगरसेवकांनी अखेरच्या सभेलाही उशीरच केला, म्हणून त्यांची चेष्टा केली. त्यांनीही त्याला हसून दाद दिली. १४ मार्चच्या सभेला लवकर यायचे, असे ठरवूनच सर्वांनी निरोप घेतला.