शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई उपनगरात सर्वाधिक पाऊस तर बुलढाणा अजूनही तहानलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 17:18 IST

मराठवाड्यातील ८ पैकी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. 

ठळक मुद्देकोकणात १५, मराठवाडा १६, विदर्भात ६ टक्के अधिक तर मध्य महाराष्ट्रात १ टक्का कमी पाऊस

पुणे: कोकणात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या पावसाने किनारपट्टी भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून मुंबई उपनगरात सर्वाधिक ६० टक्के पाऊस जास्त झाला आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सर्वात  ३८ टक्के कमी पाऊस पडला  आहे़. कोकणात सर्व जिल्ह्यात मिळून १५ टक्के अधिक पाऊस झाला असून मराठवाड्यात १६ टक्के, विदर्भात ६ टक्के अधिक पाऊस झाला  आहे़. मध्य महाराष्ट्रात १ टक्का कमी पाऊस झाला आहे़. राज्यातील १० जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे़. भारतीय हवामान विभागामार्फत जिल्ह्यात नोंदविण्यात आलेल्या पावसावरुन एकूण जिल्ह्यात किती पाऊस पडला, याची सरासरी काढली जाते़. त्यावरुन जिल्ह्याचा पाऊस निश्चित केला जातो़ . १ जूनपासून ४ जुलैपर्यंत कोकण, मराठवाडा व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर -१३, नंदूरबार २८, नाशिक ११, सांगली -२१, सातारा -३ या पाच जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे़. कोकणातील सर्व ७ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस तर मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांपैकी ५ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. मराठवाड्यातील ८ पैकी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. राज्यातील अनेक भागात असमान पाऊस असतो़ काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी कमी पाऊस पडतो़. पण, राज्यात सर्वत्र पर्जन्यमापक यंत्रे नसल्याने जिल्ह्यातील मोजक्या ठिकाणी पडलेला पाऊस मोजला जातो़. त्यावरुन जिल्ह्याची सरासरी काढली जाते़ त्यावरुन जिल्ह्यात साधारण किती पाऊस झाला याचा अंदाज येत असतो़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र