शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी; परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 17:47 IST

बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळाकडून प्रयत्न होत असताना सामूहिक कॉपीच्या प्रकाराने तालुक्यात खळबळ

यवत :  केडगाव (ता. दौंड) येथे बारावी बोर्डाचे परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपी करण्यास विद्यार्थ्यांना मदत केल्याप्रकरणी परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर मोठी काळजी घेतली जात आहे. अशातच केडगाव येथे सामूहिक कॉपी प्रकरणात परीक्षण केंद्रप्रमुख यांच्यासह नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.              पुणे जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने केडगाव येथील जवाहर विद्यालय असणाऱ्या परीक्षा केंद्रात भेट दिली असता सदर प्रकार उघडकीस आला. भरारी पथकाचे प्रमुख व  विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी याबाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे.

सोमवार (दि.२७) रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील जवाहर विद्यालयातील बारावीची परीक्षा केंद्र क्रमांक १९३ येथे अचानक भेट दिली. तेव्हा परीक्षा काॅपीमुक्त न करता, विद्यार्थ्यांना सामूहिक काॅपी करण्यासाठी प्रतिबंध न करता, त्यांची अंगझडती न घेता,  त्यांना काॅपी करण्यासाठी उत्तेजन देऊन अप्रत्यक्ष सहाय्य केले. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा सन १९८२ ( महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा 1982 चे कलम 8 प्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी दिली.

आरोपी परीक्षा केंद्र संचालक जालींदर नारायण काटे, उपकेंद्र संचालक रावसाहेब शामराव भामरे, शिक्षक  प्रकाश कुचेकर,  विकास दिवेकर, शाम गोरगल, कविता काशीद, जयश्री गवळी, सुरेखा होन, अभय सोडनवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे करीत आहेत.

कॉपी पकडल्यास पुढच्या पेपरवर प्रतिबंध 

बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. परीक्षेदरम्यान केंद्रांवर भरारी पथकाद्वारे पाहणी केली जात आहे. विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जात आहे. एकदा कारवाई केल्यावर विद्यार्थ्यांना पुढचे कुठलेही पेपर देता येत नाही. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाते. म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा वापर करू नये असे शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षक