भाजपाचा पराभव करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा 'मविआ' ला पाठिंबा - कॉम्रेड अजित अभ्यंकर

By अजित घस्ते | Published: April 26, 2024 07:05 PM2024-04-26T19:05:50+5:302024-04-26T19:06:10+5:30

देशातील राज्यघटना मोडीत काढण्यासाठीचे प्रयत्न भाजपाचे मोदी-शहा यांचे सरकार करीत आहे

Marxist Communist Party supports mahavikas aghadi to defeat BJP Comrade Ajit Abhyankar | भाजपाचा पराभव करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा 'मविआ' ला पाठिंबा - कॉम्रेड अजित अभ्यंकर

भाजपाचा पराभव करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा 'मविआ' ला पाठिंबा - कॉम्रेड अजित अभ्यंकर

पुणे : देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात आयात निर्यात धोरणे राबवून, हमीभावाचा कायदा करण्याचे नाकारून त्याचवेळी नवे कायदे करून शेती मोठया कार्पोरेट्सच्या हातात देण्याची धोरणे मोदींनी राबविली आहेत. आदिवासींची देशातील घनदाट जंगलांपासून ते लडाख आणि पूर्वोत्तर भारतातील जमिनी फुकटात वाटण्यात येत आहेत. तसेच देशातील तरूणांसमोर बेरोजगार, अनुसूचित जाती-जमाती वर वाढते अन्याय अत्याचार, तसेच मणिपूर, कुस्तीपट्टू महिलांवर अन्याय अत्याचार करणा-याना पाठिशी घालणे आणि देशातील राज्यघटना मोडीत काढण्यासाठीचे प्रयत्न भाजपाचे मोदी-शहा यांचे सरकार करीत आहे.

यामुळे मोदी-भाजपाचा पराभव करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यात आला आहे असे पत्रकार परिषदेत शुक्रवारी स्पष्ट केले. यावेळी कॉम्रेड अजित अभ्यंकर, किरण मोघे, गणेश दराडे, वसंत पवार, अमोल वाघमारे, ज्ञानेश्वर मोटे इ. उपस्थित होते.

लोकशाहीसाठी लढणा-या उमेदवारांना पाठिंबा देत त्यांच्या समर्थपणे उतरण्याचा निर्यण घेतला आहे. राज्यातील भाजपाच्या व महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी जिल्हातील महाविकास आघाडीतील उमेदवारांना पाठिंबा देत मोदी-भाजपाचा पराभव झाला. तरच देशाचे भवितव्य राहिल असे कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी मत व्यक्त केले. यावेळी किरणे मोघे म्हणाल्या, भारतातल्या महिलांसाठी समानता आणि न्यायाची गॅरंटी म्हणजे आपली राज्य घटना आहे. परंतु भाजप आणि त्यामागे असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ती बदलून परत महिलांचे शोषण, अत्याचार आणि जातीव्यवस्थेचे समर्थन करणारी मनुस्मृती परत अंमलात आणायची आहे. गेल्या १० वर्षात भाजपाने संविधानाची सर्व तत्व धाब्यावर बसवली आहेत. सध्या लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली आहे. हे वातावरण बदलायचे असेल तर भाजपाला सत्तेतून घालवायला पाहिजे. 

Web Title: Marxist Communist Party supports mahavikas aghadi to defeat BJP Comrade Ajit Abhyankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.