शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; आठव्या मजल्यावरुन घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 21:14 IST

लग्नात दिलेले दागिने कमी वजनाचे भरले, ते वजन वाढवून आणण्यासाठी तसेच बुलेट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, याकारणावरुन सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने ८ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली

पुणे : लग्नात दिलेले दागिने कमी वजनाचे भरले, ते वजन वाढवून आणण्यासाठी तसेच बुलेट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, याकारणावरुन सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने ८ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली.

कल्याणी प्रधान (वय ३२) असे या विवाहितेचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी अजितकुमार अनंतचरण प्रधान, पदमावती प्रधान, अनंतचरण प्रधान, अभिमन्यु प्रधान, ममता प्रधान (सर्व रा. ड्रीम्स आकृती सोसायटी, काळेपडळ, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाबन किशोरचंद परिडा (वय ४२, रा. ओडीसा) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितकुमार याच्यासमवेत फिर्यादी यांची बहिण कल्याणी हिचा जून २०१८ मध्ये विवाह झाला होता. लग्नात दिलेले दागिने कमी वजनाचे भरले आहेत. ते वजन वाढवून आणण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास सांगून त्या कारणावरुन तिला शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती. तसेच बुलेट घेण्यासाठी पैशांची मागणी होत होती. हा जाच असहय झाल्याने कल्याणी हिने ११ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ८ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक वाडकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसDeathमृत्यूmarriageलग्न