शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उदंड झालेल्या आठवडे बाजारांना चाप लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘शेतकरी आठवडे बाजार’च्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर विविध व्यावसायांचाच बाजार भरला जात आहे. उदंड झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘शेतकरी आठवडे बाजार’च्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर विविध व्यावसायांचाच बाजार भरला जात आहे. उदंड झालेल्या अशा आठवडे बाजारांना चाप लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापुढे कृषी व पणन मंडळाच्या मान्यतेशिवाय व महापालिकेने ठरवून दिलेल्या जागांव्यतिरिक्तच्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारांवर कारवाई होणार आहे़

‘शेतकरी ते ग्राहक’थेट शेतमाल विक्रीकरीता उदयास आलेल्या ‘शेतकरी आठवडे बाजार’ ही संकल्पना बाजूला सरली असून येथे इतर व्यापारीच आपले व्यवसाय थाटत आहेत. आजमितीला शहरात जागोजागी भरणाऱ्या आठवडे बाजारात शेतमाल विक्रीच्या नावाखाली कपडे, भांडी, गृहपयोगी साहित्य आदींची रेलचेल अधिक असते. यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून वाहतूककोंडीच्या समस्या सातत्याने उद्भवत आहे़

या पार्श्वभूमीवर आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत गुरुवारी आठवडे बाजार आयोजित करणाऱ्या काही संस्था, कृषी व पणन विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ यावेळी महापालिकेने यापुढे खासगी संस्थांना आठवडे बाजारकरीता थेट परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे़

१५० शाळांची मैदाने व २७ मंडईच्या जागेबाबतचा प्रस्ताव

महापालिकेने अ‍ॅमिनेटी स्पेस आठवडे बाजारांसाठी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव महापालिकेने न स्वीकारता, त्याऐवजी कृषी व पणन विभागाला महापालिकेच्या १५० शाळांची मैदाने व शहरातील २७ मंडईच्या जागा देण्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे या ठिकाणी आठवडे बाजार झाल्यावर त्या रात्रीच स्वच्छता केली जाईल. तसे न झाल्यास दुसऱ्या दिवशी संबंधित शाळा अथवा मंडईकडून याबाबत महापालिकेकडे तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करणे सोपे जाणार आहे़

अतिक्रमण विभागाकडून थेट कारवाई

दरम्यान यापुढे आठवडे बाजारासाठी दिलेल्या जागेव्यतिरिक्त रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून थेट कारवाई केली जाणार असल्याची माहितीही महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली़