ख्रिसमससाठी सजल्या बाजारपेठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 16:43 IST2018-12-24T16:40:42+5:302018-12-24T16:43:01+5:30
येशू ख्रिस्ताचा जन्म अर्थात ख्रिसमस सणासाठी पुण्यतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून शहरातील विविध चर्चमधील तयारी सुद्दा आता अंतिम टप्प्यात आली आहे.

ख्रिसमससाठी सजल्या बाजारपेठा
पुणे : येशू ख्रिस्ताचा जन्म अर्थात ख्रिसमस सणासाठी पुण्यतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून शहरातील विविध चर्चमधील तयारी सुद्दा आता अंतिम टप्प्यात आली आहे.
जगभरात 25 डिसेंबर राेजी ख्रिसमस माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. हा दिवस म्हणजे जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस. हा सण साजरा करण्यासाठी पुण्यातील बाजारपेठा आता सज्ज झाल्या आहेत. पुण्यातील एम जी राेड, नाॅर्थ मेन राेड, एफ सी राेड, जे एम राेड आदी रस्त्यांवर सजावटीसाठी लागणारे साहित्यांच्या बाजारपेठा फुलल्या आहेत. अवघ्या एका दिवसावर हा सण येऊन ठेपल्याने नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. ख्रिसमस ट्री पासून ते लायटींगचे साहित्य अशा विविध वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ख्रिसमस मधील सर्वांचा आवडत्या सॅन्टा चे कपडेही बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. खासकरुन सॅन्टाची टाेपी तरुणांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबराेबर चाॅकलेट खरेदीसाठी सुद्दा माेठी गर्दी हाेत आहे.
ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये प्रार्थना हाेत असल्याने शहरातील सर्व चर्चमध्ये सजावट करण्यात येत आहे. शहरातील चर्चला आकर्षक अशी विद्युत राेषणाई देखील करण्यात आली आहे. ख्रिसमसच्या आदल्या दिवशीच रात्री उशीरा शहरातील रस्ते गर्दीने फुलून जातात. तरुणाई माेठ्याप्रमाणावर एम जी रस्ता, कॅप्म भाग, एफसी रस्त्यावर उतरत असते. प्रत्येकजण एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. सर्वत्र आनंदाचे तसेच उत्साहाचे वातावरण आहे.