शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; ‘कॉपी’ला आळा घालण्यासाठी कडक नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:06 IST

कॉपीमुक्त परीक्षा आणि कडक कारवाईचा इशारा

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2025 बारावी परीक्षा उद्यापासून 11 फेब्रुवारी सुरू होत आहे. यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा 10 दिवस आधी सुरू होत असून निकालही लवकर जाहीर करण्याचा मानस आहे. 15 मेपर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.राज्यात 9 विभागीय मंडळांत परीक्षा, 3376 केंद्रांवर आयोजनराज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांत परीक्षा घेतली जाणार आहे. 3373 मुख्य परीक्षा केंद्रे आणि 3376 परीक्षा उपकेंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.विद्यार्थ्यांची संख्या आणि शाखावार वर्गीकरणयंदाच्या बारावी परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी –• विज्ञान शाखा – 7,68,967 विद्यार्थी• कला शाखा – 3,80,410 विद्यार्थी• वाणिज्य शाखा – 3,19,439 विद्यार्थी• किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम – 31,735 विद्यार्थी• टेक्निकल सायन्स – 4,486 विद्यार्थीकॉपीमुक्त परीक्षा आणि कडक कारवाईचा इशारागेल्या परीक्षांमध्ये काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने यंदा कडक नियम लागू करण्यात आले आहेत. गैरमार्गाचा वापर होणाऱ्या केंद्रांवर परीक्षा केंद्र मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल.गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथके आणि विशेष समित्यासंभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यभर 271 भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक विभागीय मंडळात विशेष भरारी पथके आणि दक्षता समित्या कार्यरत राहणार आहेत.विशेष सुविधा – आजारी किंवा अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षाजे विद्यार्थी वैद्यकीय, व्यापारिक किंवा तत्सम कारणांमुळे नियोजित तोंडी, प्रकल्प किंवा अन्य परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी 12, 15 आणि 17 मार्च रोजी ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा आयोजित केली जाईल.बारावी परीक्षा कालावधी – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025बारावी परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 18 मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थी