शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Marathi Bhasha Din :अमराठी भाषिकांसाठी मराठी’ अभ्यासक्रमाला मिळेनात विद्यार्थी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 16:07 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’ या पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थी मिळत नसल्याने विभागावर हा अभ्यासक्रम बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’ या पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थी मिळत नसल्याने विभागावर हा अभ्यासक्रम बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र, शासकीय पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त असल्याने अमराठी भाषिक अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेविषयी मार्गदर्शनपर वर्ग घेण्याचा प्रयत्न मराठी विभागातर्फे केला जाणार आहे.

विद्यापीठाच्या मराठी विभागाने काही वर्षांपासून ‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’, पटकथालेखन, प्रशासकीय मराठी आदी पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यातील अमराठी भाषिकांसाठी मराठी या अभ्यासक्रमासाठी पहिले दोन वर्षे प्रत्येकी १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर केवळ ७ विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासाठी प्रतिसाद मिळाला. तर मागील वर्षी केवळ दोन विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला. परंतु, दहापेक्षा अधिक विद्यार्थी असतील तरच हा अभ्यासक्रम सुरू ठेवता येईल, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे मराठी विभागाला कळविण्यात आले. त्यामुळे सध्या एकही अमराठी विद्यार्थी विद्यापीठातून मराठी भाषेचे धडे गिरवत नसल्याचे समोर आले आहे.अमराठी भाषिकांसाठी मराठी या अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, विद्यापीठातर्फे दरवर्षी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. परंतु, विद्यार्थ्यांकडून त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शासनातील विविध विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या अमराठी भाषिक अभ्यासक्रमाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र वर्ग घेण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. शासनाच्या कोणत्याही कार्यालयाने जागा उपलब्ध करून दिल्यास विभागामार्फत तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.शासनाच्या मराठीविषयक धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध विभागांत प्रशासकीय मराठीचा वापर झाला पाहिजे. त्यामुळे मराठी विभागातर्फे ‘प्रशासकीय मराठी’ हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्याचेही मार्गदर्शन विद्यापीठातील व शासनाच्या इतर प्रशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने आवश्यक निर्देश देणे गरजेचे आहे, असेही डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले.‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’ या अभ्यासक्रमास सध्या विद्यार्थी नाहीत. परंतु, या अभ्यासक्रमास अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी विभागातर्फे प्रयत्न केले जातील. तसेच विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास विभागाकडून पुन्हा  मार्गदर्शनपर वर्ग सुरू केले जातील.- डॉ. तुकाराम रोंगटे, मराठी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनPune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षण