शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

Maratha Reservation: यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही; मराठा मोर्चा क्रांती समितीची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 4:51 PM

हिंसक कारवाया करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप

मुंबई: क्रांती दिनानिमित्त करण्यात आलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे यापुढे रस्त्यावर आंदोलन न करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चानं केली आहे. बाहेरच्या शक्ती घुसल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजाला आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोपदेखील मराठा क्रांती मोर्चा समितीनं पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. पुण्यात काल झालेल्या हिंसक आंदोलनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मराठा क्रांती समाजाच्या वतीनं पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये, असा आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे पुढील आंदोलन संख्येचं नव्हे, तर शांततेचं आणि संयमाचं असेल, असं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं. यापुढे मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करणार नसल्याची मोठी घोषणा यावेळी करण्यात आली. 15 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या निरपराध कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले नाही, तर आत्मक्लेश आणि चूलबंद आंदोलन करू आणि त्यानंतर तालुका-जिल्हा स्तरावर साखळी पद्धतीनं चक्रीउपोषण करू, असा इशारादेखील यावेळी मराठा समाजाकडून देण्यात आला.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPuneपुणे