Maratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 11:13 IST2018-08-03T11:09:39+5:302018-08-03T11:13:39+5:30
Maratha Reservation: उदयनराजे भोसले प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांना आमंत्रित करणार

Udayanraje Bhosale Press Conference Maratha Reservation
पुणे - मी काही नेता नाही, मला कोणतीही प्रसिद्धीच्या नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यात दिली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षण विषयावर विचार मांडले. तत्पूर्वी त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम जी गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, आंदोलनाला दिशा देण्यासाठी ही परिषद असेल. तिथे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील असेल. मात्र ही दिशा हिंसक नसावी. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारी नसणार आहे हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माफक अपेक्षा आहे ते जर वेळेत मिळाले असते तर लोकांना जीव द्यावे लागले नसते अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी मागील व सध्याच्या सरकारच्या दिरंगाईच्या धोरणावर त्यांनी आक्षेप नोंदवला ते म्हणाले की, दीड वर्षांपूर्वी 58 मूकमोर्चे निघाले. मात्र त्यात सरकारने फक्त आश्वासन दिले. मात्र वेळ जाईल तसं त्याकडे सोयीप्रमाणे दुर्लक्ष केले. प्रश्न जर वेळीच हाताळला असता तर ही वेळ आली नसती. या समाजावर वेळच अशी आली आहे की आंदोलनाशिवाय पर्याय नाही. अॅट्रोसिटीच्या बाबतीत सरकार तत्परता दाखवत असेल तर मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही असा सवालही त्यांनी विचारला.