Maratha Reservation : सातारा गॅझेटबाबत पावले उचलण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 09:52 IST2025-09-13T09:51:51+5:302025-09-13T09:52:03+5:30

सातारा गॅझेटचा अभ्यास करून तो अहवाल तीन ते चार दिवसांत सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. यावर पुणे विभाग स्तरावर काय झाले याबाबत चर्चा केली.

Maratha Reservation Steps have been taken regarding Satara Gadget | Maratha Reservation : सातारा गॅझेटबाबत पावले उचलण्यास सुरुवात

Maratha Reservation : सातारा गॅझेटबाबत पावले उचलण्यास सुरुवात

पुणे : मराठा आरक्षण लागू करण्यासाठी सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल देण्याच्या सूचना आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना केल्या होत्या. त्यानुसार समितीचे सदस्य आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी याबाबतच्या कार्यवाहीची माहिती घेतली. मात्र, अहवालाबाबत ठोस माहिती देण्यास नकार दिला.

मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांकडून सातारा गॅझेटची सातत्याने मागणी करण्यात येत होती. मात्र, जरांगे यांच्या उपोषणानंतर झालेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने केवळ हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला होता, तर सातारा गॅझेटबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र, या मागणीबाबत दबाव वाढत गेल्यानंतर सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती समितीचे सदस्य सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली काही दिवसांपूर्वी साताऱ्यात दिली होती. त्यानंतर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानंतर भोसले यांनी याबाबतच्या कार्यवाहीची माहिती पुलकुंडवार यांच्याकडून घेतली. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील उपस्थित होते. याबाबत भोसले म्हणाले, उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातारा गॅझेटबद्दल विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांबद्दल चर्चा केली. पुढे काही जास्त चर्चा झाली नाही.

सातारा गॅझेटबद्दल अधिकृत बैठक नव्हती. उप समितीची बैठक घेण्याचे अधिकार हेच अध्यक्षांना आहेत. सातारा गॅझेटचा अभ्यास करून तो अहवाल तीन ते चार दिवसांत सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. यावर पुणे विभाग स्तरावर काय झाले याबाबत चर्चा केली. गॅझेटचा अभ्यास करून कुणबी व मराठे हे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळे सरकारला दिलेल्या मुदतीत याचा अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी लागणार आहे. तसेच मोडी लिपीतज्ज्ञांची मदत घ्यावी लागणार आहे. या गॅझेटमध्ये मराठ्यांची तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक स्थिती विषद करण्यात आली आहे.

Web Title: Maratha Reservation Steps have been taken regarding Satara Gadget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.