शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांनी खासदार संभाजीराजेंना सांगितला मराठा आरक्षणासाठीचा 'हा' कायदेशीर मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 18:46 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा; संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर त्यात ताजेपणा येईल : प्रकाश आंबेडकर 

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा राष्ट्रपतीमार्फत पुनर्विचार याचिका हा सध्या कायदेशीर मार्ग आहे, असे मत वंचित विकास बहुजन पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे, खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर ताजेपणा येईल, असेही त्यांनी सांगितले. 

खासदार संभाजी महाराज यांनी आज अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील घरी भेट घेऊन मराठा आरक्षणाबरोबरच विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. संभाजी महाराज यांनी सांगितले की, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते. तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत का?. शाहु महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचा समतेचा वारसा आम्हाला मिळाला आहे. समाजातील जातीय विषमता कमी करण्यासाठी बहुजन समाज एका छत्राखाली कसा आणता येईल. समतेचा हा विचार पुढे नेण्यासाठी काय करता, याविषयी आमची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर त्यांनी २ ते ३ मार्ग आम्हाला सांगितले.

अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले की, आरक्षण हा समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मार्ग आहे. त्याचबरोबर प्रशासन आरक्षण हे अ‍ॅडमिनिस्टेशन प्रिन्सिपल होत आहे. पण इथले राज्यकर्ते ते मानायला तयार नाहीत. मराठा आरक्षणचा प्रश्न पुढे न्यायचा असेल तर त्यासाठी राज्यसत्तेची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणावर ससंदेत सांगितले की, आरक्षण ही एक खिडकी आहे. ती आम्ही खुली केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही खिडकी बंद झाली आहे. त्यावर उपाय म्हणून राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पूवर्विचार याचिका दाखल करता येईल. ती फेटाळली तरी पुन्हा दुसरी याचिका दाखल करता येऊ शकते. 

शरद पवारांनी नरो वा कुंरोवा भूमिका सोडावी...अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, शरद पवार यांचे राजकारण ४० वर्षे पाहतोय. ते नेहमी नरो वा कुंरोवा भूमिका घेतात. इतर प्रश्नांवर ठीक आहे. पण मराठा आरक्षणावर ते नजीक काळात स्पष्ट भूमिका घेतील, अशी अपेक्षा करुया.

संभाजी राजे यांनी सांगितले की, गायकवाड अहवालातील त्रुटी भरुन काढाव्या लागतील. त्यासाठी काही दिवस लागतील. मराठा आरक्षण हा प्रश्न व्यापक करण्यासाठी लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, शरद पवारांसह प्रकाश आंबेडकर यांनाही बोलावणार आहे. 

......लोकांना वेठीस धरु नयेविनायक मेटे हे ५ जून रोजी आंदोलन करणार आहे, त्याविषयी संभाजी राजे यांनी सांगितले की, हा न्यायप्रविष्ठ विषय आहे. त्यातून मार्ग काढण्याचे काम आम्हा लोकप्रतिनिधींचे आहे. तेव्हा लोकांना वेठीस धरु नये. मात्र, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मार्ग आहेत. 

मराठा आरक्षण मुद्दा त्रासदायकमराठा आरक्षणासह सर्वच आरक्षणाचे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यकर्त्यांना त्रासदायक ठरणार आहे. येणार्‍या सरकारला काही वेळा राजसत्ता चालवायला अडचणीचे ठरेल, असा इशारा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती