शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ५ जून नंतर लॉकडाऊन असला तरी मोर्चा काढणार; शिवाय मंत्र्यांच्या गाड्या अडवणार: विनायक मेटे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 17:00 IST

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये: विनायक मेटे यांचा आरोप..

पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये. मराठा समाजाचं आरक्षण रद्द होण्याला अशोक चव्हाण यांच्याबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील तितकेच जबाबदार आहेत. हे सरकार नाकर्ते आहेत, बुजगावणे आहे. आरक्षणासाठी कायदेशीर प्रयत्न करायचे असतात. पत्र लिहून आणि हाता पाया पडून आरक्षण मिळत नाही, अशा शब्दात शिवसंग्राम पक्षाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच १८ मे रोजी राज्यभरातील तहसीलदारांना निवेदन देणार असून ५ जून नंतर लॉकडाऊन असला तरी मोर्चा काढणार असल्याचे मेटे यांनी यावेळी सांगितले. 

मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर विनायक मेटे यांनी पहिल्यांदाच पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली. मेटे म्हणाले, मराठा समाजात जो असंतोष आहे, तो दडपण्यासाठीच लॉकडाऊन लावला आहे.मात्र, आम्ही ५ जून नंतर लॉकडाऊन असला तरी मोर्चा काढणार आहोत. शिवाय मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचं आवाहन आम्ही करणार आहोत. आमदार खासदार, मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही. 

अशोक चव्हाण यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं ... १०२ घटनादुरुस्तीबाबत काही लोकांनी संभ्रम निर्माण केला होता. अशोक चव्हाण यांच्यावर हक्कभंग आणला गेला होता. तरी अशोक चव्हाण यांचे खोटं बोलणं सुरूच आहे. त्यांनी केंद्राचे आभार मानले पाहिजे, मात्र त्याऐवजी ते फक्त आरोप करायचं काम करताहेत.अशोक चव्हाण यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं अशी झाली आहे अशा शब्दात मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

सर्वच जर केंद्राने करायचं मग तुम्ही काय करणार, मेटेंचा सवालमराठा आरक्षणाच्या बाबतीत ही सगळी लोकं तोंडावर पडली आहेत. यांचं तोंड काळ झालं आहे. याचिका राज्य सरकारने दाखल करण्याची आवश्यकता होती, मात्र त्यांनी फक्त टीका केली आहे.१०२ घटनादुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार काढून घेतले नाहीत सर्वच जर केंद्राने करायचं मग तुम्ही काय करणार असा सवाल मेटे यांनी यावेळी केला. 

देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून राष्ट्रपतीची भेट घेणार 

आम्ही लवकरच यासंदर्भात राज्यपालांना भेटणार आहोत, आणि आघाडी सरकारला तुम्ही जाब विचारावा आणि त्यांना समज द्यावी असं निवेदन आम्ही राज्यपालांची भेट घेऊन देणार आहोत. तसेच आम्ही देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून राष्ट्रपतीची भेट घेणार आहोत.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणAshok Chavanअशोक चव्हाणVinayak Meteविनायक मेटे